खासदार सुनील मेंढे यांनी तहसील कार्यालयात घेतली आढावा बेठक



गोंदिया, सडक अर्जुनी , दिनांक , 21 एप्रिल 2021 – तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथे आज  सुनील मेंढे खासदार भंडारा – गोंदिया यांनी कोरोणा विषयी आढावा बैठक घेतली. त्यावेळी उपस्थित हर्ष मोदी युवामोर्चा महामंत्री गोंदिया जिल्हा, तहसीलदार खोकले, खंडविकास अधिकारी , तालुका वैद्यकीय अधिकारी डाक्टर हर्षवर्धन मेश्राम, पोलिस निरीक्षक सचिन वागळे, शेषराव गिरेपुंजे, तुकाराम राणे, सौन्दड येथील ग्राम.पं. सचिव देशमुख व अन्य यावेळी उपस्थित होते.

खासदार सुनील मेंढे यांनी तालुक्यात कोरोना बाबद काय उपाय यौजना करण्यात आल्या आहेत आणि काय केलं पाहिजे या विषयावर चर्चा केली. त्यातच तालुक्यातील ग्राम सौन्दड येथे सुद्धा लवकरच करोना चाचणी करण्यासंबंधने काम चालू होणार आहे असे दरम्यान त्यांनी सांगितले व तसे आरोग्य विभागाला सूचना दिल्या. जनतेने शासनाला सहकार्य करावे असे आव्हाहन देखील केले, तर आजारी नागरिकांनी करोना चाचणी करून घ्यावी असे दरम्यान सांगितले.



 

Leave a Comment