‘दलाल’ कॉंग्रेश कार्यकर्त्यांकडून पत्रकाराला जेल मध्ये फिट करण्याचा गेम?


  • अधिक दराने स्टेम्प पेपर विक्री, तक्रार मागे न घेतल्याने ‘ पत्रकाराचा वचका काढण्याचा प्रयत्न.
  • शेषराव गिर्हेपुंजे, गौरेश बावनकर, गायत्री इरले, ठाणेदार किशोर पर्वते, यांनी घेतला ठेका ?
  • मारवाडे यांनी माध्यमांबरोबर बोलतान्हा केले विविध आरोप.
  • तक्रार दारांची हिप्नोटीजम वा नार्को टेस्ट करण्याची केली मागणी.


गोंदिया, सडक/अर्जुनी – विशेष प्रतिनिधी – दिनांक – २९ मार्च २०२१ – एखानद्या पत्रकाराने राजकीय लोकांच्या किवा पोलिसांच्या विरोधात वृत्त प्रकाशित केले तर अश्या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राजकारणी लोकांच्या माध्यमातून केला जाते, त्याला जेल मध्ये कोंबले जाते, काही वेळा त्यांची हत्या सुद्धा केली जाते, असे अनेक उदाहर आपण ऐकली असेल, एकंदरीत हेतुपरस्प त्याचा वचका काढण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय.

 


रुद्रसागर न्यूज पेपर ची आवृती वाचण्यासाठी व मोफत pdf डॉउनलोड करण्यासाठी वरील पेपर ला क्लिक करा,


१०० रुपयाला मिळणारे स्टेम्प पेपर ११० ला विक्री.


२०१६ -१७ – १८ या कालावधीत मी बबलू मारवाडे लोकमत या मराठी वृत्तपत्रा साठी सौन्दड गावातून ( वार्ताहर ) प्रतिनिधी म्हणून काम करीत होतो, त्यातच अन्य वृत्त पात्रांना देखील बातम्या देत होतो, पत्रकारिता छेत्रात अत्यंत अग्रेसर राहून मी सडक अर्जुनी तालुक्यात काम केल, या मुळे माझी तालुक्यात अल्पकाळात ओळख निर्माण झाली, तालुक्यात चालत अश्लेले अवेध वेवसाय व पोलिस विभागाच्या गलिच्छ कार्यप्रणाली बाबद आपल्या बातम्यांच्या माध्यमातून आवाज उठविल्या मुळे मला दोन वेळा पोलिश कोठळी तर एक वेळा भंडारा जेल ची हवा खावी लागली. ते ही राजकारणी लोकांच्या आशीर्वादा मुळे, वरील कालावधीत मी बबलू मारवाडे, अजय सुतार आणि तुषार मारवाडे या तिघांनी मिळून दिशा पी. एम. या नावाने शासनाचा एक ऑनलाईन प्रोजेक्ट सी. एस. सी. सेंटर च्या माध्यमातून घेतला होता, त्यात ऑनलाईन प्रशिक्षण चे काम होते, हा सी. एस. सी. सेंटर अजय सुतार यांच्या नावाने होता, आम्ही दोन पार्टनर म्हणून या प्रोजेक्ट करिता १०० रुपयाचे स्टेम्प पेपर नोटरी करीता अजय सुतार यांच्या नावाने विकत घेतले होते. अश्यात सडक/अर्जुनी च्या तहसील कार्यालय च्या बाजूला स्टेम्प वेन्डर बसतात, त्यातील एका स्टेम्प विक्रेत्याकडे १०० रुपयाच स्टेम्प पेपर खरेदी केल, हा स्टेम्प पेपर अजय सुतार यांच्या नावाने खरेदी करण्यात आला होता. महिला स्टेम्प वीक्रेत्यानी १०० रुपयाला मिळणाऱ्या स्टेम्प चे चक्क ११० ते १२० रुपये मागितले, त्यावर मी बबलू मारवाडे अधिकचे १० रुपये देण्यासाठी विरोध केला व किमती पेक्षा ज्यादा दराने स्टेम्प पेपर विक्री करणे हा गुन्हा असून सुद्धा आपण अधिकचे पयसे का घेता असे बोलून, पूर्वी सुधा आपण माझ्याकडून तिकीट खरेदी केली असता त्याचे ज्यादा पयसे घेतले होते, १०० रुपयाला मिळणारा स्टेम्प ९७ रुपयाला स्टेम्प विक्रेत्याला मिळते, त्यावर ३ रुपयाची कमिशन विक्रेत्याला मिळते, मात्र तसे न करता लालसे पोटी ११० ते १२० रुपयाला विक्री केली जाते, एकंदरीत गोर गरीब जनतेची सर्रास लुट केली जाते. करिता आपली तक्रार संबंधीत विभागाकडे करतोय असे बोलून व्हिडिओ चित्रफीत काढली.

अवैध स्टेम्प वसुली वर तक्रार केल्याने दिली धमकी.


तहसीलदार यांच्याकडे रीतसर तक्रार दिनांक – १६/ ११/ २०१७ ला मी लेखी स्वरुपात केली , त्यावर काय कार्यवाई करण्यात आली, याची माहिती घेण्यासाठी दि. १९/ ०१/ २०१७ ला माहितीचा अधिकार तहसील कार्यालयात लावला, आणि इथून राजकारणाची सुरवात झाली, दिनांक – २९/०१/२०१८ ला ०३ – ४७ वाजता कॉंग्रस चे तालुका अध्यक्ष शेषराव गिर्हे पुंजे यांनी मारवाडे यांना आपल्या मोबाईल क्र. – ९४२२१३०३५७ वरून फोन केला व आपल्या घरी चर्चे करिता बोलावले, यावेळी त्यांच्या घरा समोर माजी आमदार राम रतन बापु एका गाळीत बसले होते, व ते गोंदिया कडे निघाले, गिर्हेपुंजे म्हणाले आपण स्टेम्प विक्रेत्या महिला गीता बाई लांजेवार यांची तक्रार केली आहे, तर माहितीचा अधिकार लावला आहे, तो मागे घ्या, त्यांचे पती आमचे कार्यकर्ता आहेत, आपण जर तक्रार मागे न घेतल्यास माझ्या बद्दल तालुक्यात माहिती काढा, आम्ही आमच्या पद्धतीने पाहून घेऊ असी पाहून घेण्याची धमकी दिली.

शेषराव गिर्हेपुंजे यांची लेखी स्वरुपाची तक्रार दुग्गीपार पोलिसांकडे


मला धमकी दिल्या मुळे शेषराव गिर्हेपुंजे यांची लेखी स्वरुपाची तक्रार दुग्गीपार पोलिसांकडे दिनांक – ३०/ ०१/ २०१८ ला केली, त्यावर दुग्गीपार पोलीशांनी अदखल पात्र गुन्हा नोंद क्र – ३६/१८ कलम – ५०६ भादवी नोंदविला, तसेच दिनांक – ०६ / ०२ / २०१८ ला दुय्यम निबंधक कार्यालय सडक/अर्जुनी यांच्याकडे अधीक दराने स्टेम्प पेपर विक्री करणाऱ्या महिलेची लेखी स्वरुपाची तक्रार दाखल केली होती. मला फसविण्यासाठी अनेक दलालांचे मला फोन आले दिनांक – ०५, ०६, ०७, व ०८ या तारकांना सदर तक्रार मागे घ्या व ती मागे घेण्यासाठी आम्ही पयसे पण देतोय असे आमिष देनारे अनेकांचे फोन आले, कधी फोन न करणारा यातील एक “ दलाल ” गौरेश बावनकर मु. कोसमतोंडी याचा तब्बल ७ वेळा सेटेलमेंट करिता मला फोन आला, त्यांनी सुद्धा दलाली करीत ऑफर केली, त्या महिलेची तक्रार मागे घे मी एक लाख रुपये मागतोय त्यातील तुजे अर्धे आणि माझे अर्धे असे तो बोलला, त्यावर मी विचार करून सांगतोय असे बोललोय, मात्र त्यांनी मला तु आनाकानी केल्यास शेषराव भाऊ तुजा काम भारी करल जरा विचार कर व समोर अश्लेल्या काही लोकांकडे त्यांनी बोट दाखविले, मी न घाबरता तिथून निघून गेलो मात्र त्यांना वाटले असेल की आता काही उपाय नाही त्या मुळे माझी खोटी तक्रार करण्याचा डाव रचला.

पोलिसांनीच मला केले ब्ल्याक मेल.


मी त्याला दुसऱ्या दिवसी झालेल्या चर्चेची तू रेकॉर्डिंग केली असे विचारणा केली , मात्र त्यांनी त्या सर्व बाबींवर टाळाटाळ केली व तू काल ६० हजार रुपयाची मागणी केल्याचे तो स्वता फोन मध्ये बोलला व ती रेकॉर्डिंग पोलिसांना दाखविली, यात मी कोणत्याही प्रकारची मागणी केल्याचे उल्लेख माझ्याकडून झालेले नाही, किवा त्याचे पुरावे नाही, तरी देखील डूग्गीपार पोलिश स्थानकात तत्कालीन api किशोर जयवंत पर्वते, asi भीमसिंग चंदेल, psi निशा वानखेडे यांनी २ तास उलट माझी समजूत घातली की त्या महिलेची मुद्रांक कार्यालय सडक अर्जुनी कडे केलेली तक्रार मागे घ्या ती मागे न घेतल्यास तुमच्या विरोधात कार्यवाई करू असे, मी तक्रार मागे न घेतल्याने माझ्यावर गुन्हा नोंद करण्यात आला, एकंदरीत या लोकांनी मला ब्ल्याक मेल करण्याचा प्रयत्न केला , या वेळी पोलिश स्थानकात कॉंग्रेश कार्यकर्ते उपस्थित होते, ते मला पाहून हसत होते, एकंदरीत पोलिश प्रशासन आणि न्याय पालिका या लोकांच्या खिश्यात आहे, असे यावरून लक्ष्यात येते, मात्र राजकारणात पक्के अश्लेले, शेषराव गिर्हेपुंजे यांना काही वर्षा पूर्वी, पोलिसांनी घरात घुशून मारहाण केली होती, अशी माहिती लोक चर्चे दरम्यान मला मिळाली, यात कितपत सत्य आहे ते मला माहित नाही, मात्र चर्चा आहे.

गौरेश बावनकर यांनी तब्बल ७ वेळा केला फोन.


अधिक दराने स्टेम्प पेपर विक्री करणाऱ्या महिलेची मी केलेली तक्रार मागे घेण्यास नकार दिल्या मुळे मला जीवे मारण्याच्या देखील धमक्या आल्या, माझ्या वर गु. क्र – ३६/१८ दिनांक – १०/ ०२/ २०१८ रोजी ३५४, ( अ ) ३८५, ५०६ भादवी अन्वय खोटा गुन्हा नोंद करण्यात आला. ज्या वेळेचा व तारखेचा तक्रारीत उल्लेख आहे, ती चुकीची आहे, या वेळात मी माझ्या घरी होतोय, गौरेश बावनकर यांनी तब्बल ७ वेळा मला फोन करून सडक /अर्जुनीला भेटायचे आहे, म्हणून बोलावले होते, त्याच तारखेला आणि त्याच वेळेला मी त्याला भेटण्यासाठी एका वेक्तीला घेऊन सचिन मोबाईल मध्ये आलो, तिथे मी माझ्या जीवो नंबरला रिचार्ज केला, व तिथे तो भेटायला आला.

एक वेक्ती, एकाच वेळी, दोन लोकांना भेटतोय ?


जवळच बंद थेटर कडे त्यांनी मला इशारा करीत बोलावले, मात्र महिलेने दिलेल्या तक्रारीत तीच वेळ आणि त्याच तारखेचा उलेख आहे, एक वेक्ती एकाच वेळेत दोन वेक्ती कडे कसा असणार हा देखील गंभीर विषय आहे, या बाबद पोलिसांना माहिती दिली मात्र त्यांनी याकडे लक्ष दिले नाही, या लोकांनी पोलिसांना मोठी रक्कम दिली असावी असे या वरून लक्ष्यात येते, या प्रकरणा बाबद माझ्याकडे भक्कम पुरावे असून सुद्धा राजकारणी लोकांनमुळे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, मला पोलिश कोठडी झाली, पोलिसांनी माझी बाजू न एकता तसा तपास न करता हेतू परस्पर पत्रकारांचा खच्चीकरण करण्याच्या सूड भावनेतून गुन्हा नोंद केला.

महिलांच्या बाजूने कायदा, त्याचा गैर वापर


पोलीसांच म्हणणे होते, की महिलांच्या बाजूने कायदा आहे, त्या मुळे आम्हाला काहीच करता येत नाही, म्हणजेच पुरुषांना जगण्याचा हक्क नाही काय ? आणि महिलांसाठी काही कायदे नाहीत काय ? महिला आहे म्हणजे महिला अश्ल्याचा गैरफायदा घेत ब्लक मेलिंग केल तरी चालेल काय ? असे अनेक सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

न्याय पालिका विकणार तर नाही ना ?


या खटल्यावर सडक अर्जुनी च्या न्यायालयात प्रकरण चालू आहे. भ्रष्ट सिस्टम मुळे न्यायालयात सुद्धा मला न्याय मिळेल याची शक्यता नाही, ज्यांच्या कडे पयसा आणि पावर आहे, ते कुणालाही जेल मध्ये कोंबू शकतात, या सर्व प्रकारा वरून हे शिद्द होते.

मुद्रांक अधिकार्यांना चक्क मंत्र्यांचा फोन.


दिनांक – १९/ ०४/ २०१८ ला ६ प्रकारचे पुरावे मुद्रांक कार्यालय सडक अर्जुनी येथे सादर केले होते, त्यावर मुद्रांक अधिकारी भंडारा यांच्याकडे पेशी होती, महिला म्हणाल्या माझा कुणी नाही, पती वारले आणि मुलगा मानसिक आहे, असे बोलल्या , त्यावर अधिकारी बोलले ज्या अर्थी तुमच्या बाजूने मंत्र्यांचा फोन मला अनेक वेळ आला आणि तुम्ही म्हणता माझा कुणी नाही यावर महिलेला अधिकाऱ्यांनी झापले, सदर महिलेचे स्टेम्प पेपर विक्री परवाना ६ महिन्यासाठी रद्द करण्यात आले होते, ते रीनिव्हल करावे या करिता एका मंत्र्याचा फोन अनेक वेळ अधिकार्याला आल्याचे ते दरम्यान सांगत होते. मुद्रांक अधिकारी यांनी सदर महिलेचे स्टेम्प पेपर विक्री परवाना १०० रुपयाच्या स्टेम्प पेपर वर हमीपत्र लिहून घेत रिनीव्हल केला, जर या पुढे आपली तक्रार आल्याश परवाना रद्द केला जाईल, असे ताकीद दिली, आज घळीला मुद्रांक विक्री ज्यादा दराने सर्रास चालू आहे, मात्र जनतेचे लोक प्रतिनिधी यावर बोलायला तय्यार नाही, ही शोकांतिका आहे, जनतेची आज सुद्धा लुट मोठ्या प्रमाणात चालू आहे, १०० रुपयाला मिळणारा स्टेम्प पेपर ११० ते १२० रुपयाला आज विक्री केला जात आहे.

माहितीचा अधिकार लावल्या मुळे लावली खोटी अट्रोसिटी.


मी सौन्दड ग्राम पंचायत मध्ये माहितीचा अधिकार लावला होता, गावातील अनेक नागरिकांच्या समश्या वृत्त पत्रात छापले, अवैध वेवसाया बद्दल छापले, परीक्ष्या केंद्रावर होणार्या कॉपी वाटपाचे सुद्धा वृत्त छापले होते, त्याचा राग मनात धरून, ठाणेदार किशोर पर्वते, तत्कालीन dysp जवळे आणि सौन्दड येथील सरपंच गायत्री इरले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन अट्रोसिटी चा खोटा गुन्हा दाखल केला, शेषराव गिर्हे पुंजे हे त्यावेळी सडक अर्जुनी चे तालुका कॉंग्रेश या पक्षाचे अध्यक्ष होते, तर गायत्री इरले या तालुका महिला अध्यक्ष होत्या, गौरेश बावनकर हा त्यांचा कार्यकर्ता, आता हे दोघे भाजप पक्षात आहेत.

ठाणेदार किशोर पर्वते यांचा राजकारण.


कॉंग्रेश चे तालुका अध्यक्ष शेषराव गिर्हेपुंजे आणि तत्कालीन डूग्गीपार चे ठाणेदार किशोर पर्वते यांचे राजकारणी हित संबंध अश्ल्याची तक्रार मी पोलिश महा संचालक मुंबई यांच्याकडे केली होती, त्यावेळी गोंदिया येथे पोलिश अधीक्षक हरीश बेजल होते, तर dysp प्रशांत ढोले होते, किशोर पर्वते यांनी स्वताचा बचाव करण्यासाठी आणि आपले कोणतेही राजकारनी लोकांसी संबंध नाही हे दाखविण्यासाठी गिर्हेपुंजे यांना हद्दपार करण्यासाठी डूग्गीपार येथून अहवाल dysp यांना पाठविला होता, त्यावर दिनांक – १९,०९,२०१८ रोजी उपविभागीय पोलिश अधिकारी प्रशांत ढोले यांचे पत्र गिर्हेपुंजे यांना देण्यात आले, त्यात गिर्हेपुंजे यांनी उलट पोलिश विभागावर आरोप केला होता. त्याचे वृत्त बर्याच वृत्त पात्रांनी प्रकाशित केले होते, त्या मुळे तालुक्यात गोंधळ माजला होता, तालुक्यात पोलीस विभागाचा मोठा फौज फाटा त्या वेळी तेनात होता, तत्कालीन सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी तो आदेश रद्द केला असी चर्चा त्या वेळी होती, त्या मुळे गिर्हेपुंजे भाजप पक्षात शामिल झाले, आणि api चे किशोर पर्वते pi झाले असा आहे साहेबांचा राजकारण आहे.

पत्रकारिता रद्द करून तळीपार करण्याचा प्रयत्न.


सौन्दड च्या सरपंच गायत्री इरले व सचिव देशमुख यांच्या स्वाक्षरी ने मला तडीपार करण्याच्या व माझी पत्रकारिता रद्द करण्याच्या उद्देश्याने ग्राम पंचायत कार्यालय सौन्दड येथे मासिक सभेत ठराव मंजूर केला, सौन्दड, फुटाळा, बोपाबोडी, या गावातील नागरिकांचे नाव लिहून बोगस स्वाक्षरी घेण्यात आली, ती तक्रार जिल्हा अधीकारी व पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली, तक्रारीच्या अनुसंगाने दुग्गीपार पोलिश स्थानकात स्वाक्षरी अश्लेल्या काही लोकांना पोलिसांनी बोलाविले होते, मात्र कुणीही जबाब नोंदविण्यसाठी हजर झाले नाही, ग्राम पंचायत यांनी आपल्याकडे आलेल्या तक्रारीच्या अनुसंगाने हा ठराव पारित केला अश्ल्याचे उल्लेख केले आहे, मात्र सरपंच या आपल्या पदाचा गैर वापर करीत अश्ल्याचे पोलीशांच्या अहवालातून समोर आले आहे, स्वता लोकांचे बोगस स्वाक्षरी घेऊन पत्रकाराला बदनाम करण्याचा काम सौन्दड ग्राम पंचायतीच्या महिला सरपंच गायत्री एकनाथ इरले करीत आहेत यावरून लक्ष्यात येते.

छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती विटंबना प्रकरण दबले.


सौन्दड ग्राम पंचायत च्या जुन्या स्टोर रूम मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती विद्रुप अवस्थेत मिळाली होती, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाई करण्यात आली नाही, जबाबदार ग्राम सेवक यांनी सदर मूर्ती सौन्दड येथील ग्राम पंचायत कार्यालयाची असल्याची कबुली दिली, तर गावातील अनेक नागरिकांनी ही मूर्ती आपली आहे अशी कबुली दिली, मात्र महिला सरपंच यांनी ही मूर्ती आपल्या ग्राम पंचायत कार्यालयाची नाही म्हणून पत्रकार परिषद घेतली, छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रकरणी शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलन करणार होते मात्र आंदोलन झाले नाही, यात सुद्धा मोठे राजकारण आहे, मात्र या प्रकरणात खुद्द पोलिश विभाग जज असल्याच्या भूमिकेत आहेत ही शोकांतिका आहे.

तक्रार दारांची हिप्नोटीजम वा नार्को टेस्ट करण्याची मागणी.


त्या मुळे पोलिश विभागाने या सर्व प्रकरणाची सखोल चवकसी करावी, तक्रार दाराची व उल्लेख निय लोकांची हिप्नोटीजम वा नार्को टेस्ट चाचणी करावी, त्यातून सत्य बाहेर येईल, तसेच दोसीवर कायदेशीर कार्यवाई करावी असी मागणी मारवाडे यांनी दरम्यान केली आहे. १० दोषी सुटले तरी चालेल मात्र 1 निर्दोष वेक्ती वर कार्यवाही होता कामा नये ही मन फक्त पुस्तका पुरती आहे, मात्र सत्यता काही वेगळीच आहे असे या सर्व प्रकारावरून स्पष्ट होते.


 

Leave a Comment