- माझ्या बहिणींना बळ देणारी ही योजना कायम सुरू राहील : खा. प्रफुल पटेल
सडक अर्जुनी, दि. 06 नोव्हेंबर रोजी : शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला–भगिनी यांच्या उज्ज्वल भविष्याच्या प्रकाशमय वाटचालीची दिशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनाम्यात दिली आहे. समाजातील सर्व घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम आम्ही करीत आहोत, या धान बहुल भागांतील धान उत्पादन शेतकऱ्यांसाठी मागील वर्षी 20 हजार बोनस दिले, यावर्षी सुध्दा हेक्टरी 25 हजार बोनस मिळवुन देवू असे प्रतिपादन खा. श्री प्रफुल पटेल यांनी केले.
दि. 06 नोव्हेंबर रोजी आशीर्वाद लॉन सडक/ अर्जुनी येथे मोरगांव अर्जुनी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार श्री राजकुमार बडोले यांच्या चुनाव प्रचारार्थ खा.श्री प्रफुल पटेल व आ.श्री परिणय फुके यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या मित्र पक्षाची संयुक्त बैठक पार पडली.
खासदार श्री प्रफुल पटेल यांच्यासोबत सर्वश्री राजकुमार बडोले, परिणय फुके, खोमेशभाऊ रहांगडाले, यशवंत गणवीर, शेषराव गिऱ्हेपुंजे, लक्ष्मीकांत धमगाये, जितेंद्र मौर्य, रचनाताई गहाणे, तेजराम मडावी, अविनाश काशिवार, हर्ष मोदी, विलास कापगते, रजनीताई गिऱ्हेपुंजे, छायाताई चौहान, वंदना डोगरवार, कविताताई रंगारी, निशाताई तोडासे, सुधाताई रहांगडाले, चंद्रकलाताई डोंगरवार, राजेश कठाने, संगीताताई खोब्रागडे, लायकराम भेंडारकर, अशोक लंजे, रमेश चुरे, शालिंदर कापगते, चेतन वडगाये, शिवाजी गहाणे, गजानन परशुरामकर, प्रभूदास लोहिया, देवचंद तरोणे, तुकाराम राणे, शिशिर येडे, हितेश डोंगरे, गोरेश बावनकर सहित मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाऊबीजेचे औचित्य साधून खा.श्री प्रफुल पटेल यांचे लाडक्या बहिणीनी औक्षण करून आशीर्वाद दिले तसेच महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींच्या सन्मानार्थ भाऊबीज ओवाढणी दिली व सक्षम करण्यासाठी आणलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी आभार व्यक्त केला. माझ्या बहिणींना बळ देणारी ही योजना कायम सुरू राहील असे खा. श्री प्रफुल पटेल यांनी आश्वस्त केले.