सडक अर्जुनी, दि. 06 नोव्हेंबर : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी येथे दिवाळी स्नेहमिलन सोहळा दि. 05 नोव्हेंबर रोजी आयोजित केला. असून महायुतीच्या मित्र पक्षांनी या दिवाळी मिलन कार्यक्रमात हजेरी लावली असता महायुतीचे उमदेवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत मी भारतीय जनता पक्षातून वरिष्ठ नेत्यांच्या घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादी पक्षात आलो.
असून महायुतीचा उमेदवार आहो त्यामुळे हि निवडणूक फक्त माझ्या प्रतिष्ठेची नसून खा. प्रफुल पटेल उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील अस्तित्वाची असल्याचे सांगत या निवडणुकीत सर्वानी कामाला लागून महायुतीचा विजय कसा होईल यासाठी कामाला लागण्याच्या सूचना महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.