महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी प्रचाराला केली सुरवात.

सडक अर्जुनी, दि. 06 नोव्हेंबर : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आज दि. 05 नोव्हेंबर रोजी पासून प्रचाराला सुरवात केली आहे. सडक अर्जुनी येथे तयार करण्यात आलेल्या प्रचार कार्यलयाचे उदघाटन राष्ट्रवादी कॉग्रेस चे नेते राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

2009 पासून अर्जुनी मरोगाव विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीतव करीत असलेले माजी मंत्री राजकुमार बडोले याना या निवडणुकीत महायुतीने उमेदवारी दिल्याने हि निवडणूक राजकुमार बडोले यांच्यासाठी अधिक प्रतिष्ठेची झाली असून गेल्या पंधरा वर्षात बडोले यांनी राजकारणा शह सामाजिक क्षेत्रात अनेक कामे केल्याने त्याच विकास कामाच्या मुद्यांना घेऊन चौथ्यांदा हि निवडणूक लढवत असल्याचे राजकुमार बडोले यांनी सांगितले आहे.

तर बडोले यांनी आपल्या मतदार संघात प्रचार रॅली काढून मतदारांचा आशीर्वाद घेत आहेत. तर या निवडणुकीत जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक येतील असा विश्वास राष्ट्रवादी नेते राजेंद्र जैन यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

और पढ़ें