अर्जुनी मोर. विधानसभा ; हे 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.

अर्जुनी मोर., दिनांक : 05 नोव्हेंबर : अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 35 उमेदवारांनी निवडणूक लढण्याच्या इच्छेने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख दि. 04 नोव्हेंबर होती, दरम्यान 16 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे, तर 19 उमेदवार निवडणूक लढण्यासाठी ठाम उभे आहेत, दरम्यान महायुतीचे दोन कार्यकर्ते बंडखोरी करीत निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

एक आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र सुगत चंद्रिकापुरे हे तिसरी आघाडी मधून प्रहार संघटनेच्या वतीने बॅट या चिन्हावरून निवडणूक लढणार आहेत, तर रत्नदीप सुखदेव दहिवले हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, तर सुगत मनोहर चंद्रिकापुरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट चे कार्यकर्ते होते, वडिलांची उमेदवारी कापल्यामुळे त्यांनी हा टोकाचा पाऊल घेतला आहे. या विधानसभा क्षेत्रात महायुतीचे अधिकृत उमेदवार राजकुमार बडोले हे आहेत तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड हे आहेत, त्या व्यतिरिक्त अन्य पक्षाचे ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, तसेच अपक्ष उमेदवार देखील आपले नसीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उभे आहेत. या मतदार संघात निवडणूक कशी होणार हे आताच सांगता येणार नाही. ?

  • अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले खालील प्रमाणे उमेदवार.

1) राजकुमार सुदाम बडोले, राकाँ. (अजित पवार) घड्याळ.

2) दिलीप वामन बन्सोड, काँग्रेस, हात.

3) भावेश उत्तम कुंभारे, मनसे, रेल्वे इंजिन.

4) सचिन नांदगाये, बसपा, हत्ती.

5) अनिल रविशंकर राऊत, हरपा, बादली.

6) कश्यप भीमराव मेश्राम, पिपाइ, फळांची टोपली.

7) सुगत मनोहर चंद्रिकापुरे, प्रहार, बॅट.

8) दिनेश रामरतन पंचभाई, वंचित, गॅस सिलिंडर.

9) अजय सुरेश बडोले, अपक्ष, शिट्टी.

10) अजय संभाजी लांजेवार, अपक्ष, दूरदर्शन

11) अनिल कुमार प्रेमलाल मेश्राम, अपक्ष, नागरिक.

12) केतन आसाराम मेश्राम, अपक्ष, हिरवी मिरची.

13) सुजीत विक्रम खरोले, अपक्ष, रूम कूलर.

14) नीता निलकंठ साखरे, अपक्ष, अंगठी.

15) नितेश अनिल बोरकर, अपक्ष, एअर कंडिशनर.

16) प्रफुल ठमके, अपक्ष, हिरा.

17) डॉ. बबन रामदास कांब, अपक्ष, ऑटो रिक्षा.

18) रत्नदीप सुखदेव दहिवले, अपक्ष, ऊस शेतकरी.

19) राजेंद्र काशिनाथ टेंभुर्णे, अपक्ष, सफरचंद. अशी सर्व उमेदवारांची नावे आहेत, निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे असलेल्या कुठल्या उमेदवाराला जास्त पसंती मिळते हे पाहण्यासारखी असेल.  

Leave a Comment

और पढ़ें