अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रात राजकुमार बडोले यांच्या नावाची चर्चा! पण समीकरण बदलले!! 

  • पक्ष बदल ठरणार बडोलेंसाठी डोकेदुखी! 

अर्जुनी मोर, (  बबलु मारवाडे ) दिनांक : 04 नोव्हेंबर 2024 : अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे कट्टर नेते माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नावाची चर्चा काही दिवसा पूर्वी अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रामध्ये सुरू होती, अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातून आणि भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वरून दोनदा आमदार झालेले आणि एकदा मंत्री राहिलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांना या भागात मोठ्या प्रमाणात पसंती मिळत होती.

पूर्वी या भागातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तसेच मतदार देखील राजकुमार बडोले यांच्यासोबत असल्याचे चित्र होते, आजही ते चित्र आहे, पण दिसते तसे नसते साहेब. माजी मंत्री राजकुमार बडोले यांना भारतीय जनता पक्षाकडून म्हणजेच महायुती कडून 2024 ची उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चा सर्वत्र होती, आणि अशातच माजी मंत्री राजकुमार बडोले हे अपक्ष निवडणूक लढणार अशी ही चर्चा सर्वत्र होती, त्यामुळेच माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या बद्दल या भागातील कार्यकर्ते व सामान्य मतदार हा राजकुमार बडोले यांच्या बाजूने उभा होता, आणि याचाच फायदा म्हणजे महायुतीच्या वतीने अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रामध्ये केलेल्या सर्वे मध्ये माजी मंत्री राजकुमार बडोले यांची पसंती पाहायला मिळाली.

आणि त्यामुळेच आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची तिकीट कापून माजी मंत्री राजकुमार बडोले यांना या भागाची उमेदवारी निश्चित करण्यात आली, एकीकडे राजकुमार बडोले यांची सर्वत्र पसंती असताना देखील त्यांनी भारतीय जनता पक्षाला राम राम करीत स्वतःचा सार्थ साधण्यासाठी प्रफुल पटेल यांच्या विचार सरणीला डोक्यावर घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, आणि याचाच कुठेतरी विपरीत परिणाम आता अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये पाहण्यासाठी मिळत आहे.

राजकुमार बडोले यांची हवा पक्षप्रवेश करण्यापूर्वी जी होती ती आता राहिली नाही, याचा कारण म्हणजे, सर्वसामान्य मतदार व पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे, भारतीय जनता पक्षातील काही कट्टर कार्यकर्ते आम्ही घडीला मतदान करणार नाही असं दबक्या आवाजात बोलत आहेत, तर आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि वोटिंग मशीन वर जर कमळ नसेल तर नोटाला मतदान करू मात्र कमळ सोडून कुठल्याही अन्य पक्षाच्या चिन्हावर आम्ही मतदान करणार नाही असा नाराजीचा सूर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात उमटत आहे.

त्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये, माजी मंत्री राजकुमार बडोले यांची जी पक्षप्रवेशापूर्वी जनतेमध्ये पसंती होती, ती पसंती आता कमी झाल्याचे चित्र आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये राजकुमार बडोले यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे, दुसरीकडे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना जनतेमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये पाहिजे तशी पसंती मिळत नव्हती त्यामुळे महायुतीची तिकीट त्यांना मिळाली असती तरी त्यांचा पराजय निश्चित होता असं बोलले जात होते, मात्र हे समीकरण आता बदलले आहे.

प्रफुल पटेल व अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने आ. मनोहर चंद्रिकापुरे यांची तिकीट कापून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसले, त्यांच्या सोबत गद्दारी केल्याचा आरोप आहे, आणि याचाच फायदा आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र सुगत चंद्रिकापुरे यांना होणार, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून प्रहार पक्षाच्या बॅट या चिन्हावरून ते निवडणूक लढणार आहेत, प्रहार पक्षाची या भागात ओळख नसली तरी डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांना अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सध्या मोठी पसंती मिळत असल्याची लोक चर्चा आहे. याचाच एक उदाहरण म्हणजे नामनिर्देशन पत्र दाखल करतानी उपस्थित जनसागर हे एक उत्तम उदाहरण आहे, त्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील जनता येत्या निवडणुकीमध्ये कुणाला पसंती देतात हे पाहण्यासारखे असेल.

काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप बनसोड हे पार्सल उमेदवार असल्याची चर्चा संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये गुंजू लागली आहे, तर तसे आरोप देखील झाले आहेत, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते येत्या निवडणुकीमध्ये त्यांना साथ देणार का ? हे ही तितकंच महत्वपूर्ण आहे, कारण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील मतदार हा अत्यंत समजदार आहे, आणि त्यामुळेच येत्या निवडणुकीमध्ये तरुण उमेदवाराला संधी मिळणार अशी ही चर्चा आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे समीकरण होतं त्यात मोठा बदल झाला आहे.

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात अनुसूचित जातीचे समीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, जातीमध्ये पोट जाती, त्याचबरोबर वारंवार पक्ष बदलणाऱ्या नेत्यांकडे देखील या भागातील मतदारांचे लक्ष आहे, डॉक्टर अजय लांजेवार हे देखील या भागासाठी एक महत्त्वपूर्ण उमेदवार मानले जात आहेत, त्यामुळे त्यांना देखील अन्य उमेदवारांनी कानाडोळा करता कामा नये, निवडणुकीमध्ये उभे असलेल्या उमेदवारांचा दांडगा अनुभव, मतदारांशी असलेला आपुलकी पनाचा संबंध तर काही नेत्यांची हेकळगिरी, आणि अतोनात खर्च करण्यासाठी असलेला पैसा देखील या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, “कारण गुळ तेथे मासी” ही मन अगदी जुनी असली तरी आजही महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी कुठल्याही उमेदवाराला कमी न समजले तर समीकरण काही वेगळं असू शकते!

 

 

Leave a Comment

और पढ़ें