अर्जुनी मोरगाव, दि. 04 नोव्हेंबर : अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यासाठी 35 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यातील 16 उमेदवारांनी आज 04 नोव्हेंबर रोजी आपलं नामांकन अर्ज मागे घेतले आहेत तर आता 19 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत, ज्या उमेदवारांनी आपलं नामांकन अर्ज आज मागे घेतले आहे, अशा सर्व उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांची नावे खालील पुढील प्रमाणे.
1) मनोहर गोवर्धन चंद्रीकापुरे, 2) नंदागवळी राजेश मुलचंद, 3) किरण यशंवत कांबळे, 4) जगन उर्फ जयेश बारसुजी गडपाल (गुरुजी), 5) विश्वनाथ नत्थू खोब्रागडे, 6) निशांत हिरालाल राऊत, 7) किरण महादेव कटारे, 8) प्रदिपकुमार शिवराम गणवीर, 9) हरिषकुमार देवराव बन्सोड, 10) महेश (मिथुन) मनोजकुमार मेश्राम, 11) यशवंतराव धनुजी उके, 12) अशोककुमार मोतीराम लांजेवार, 13) अॅड. पोमेश सुखदेव रामटेके, 14) डॉ. भारत बाजीराव लाडे, 15) दानेश मदन साखरे, 16) रीता अजय लांजेवार यांनी नावे मागे घेतली आहेत. तर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची नावे अद्यापही उपविभागीय कार्यालय अर्जुनी मोरगाव यांनी उघड केली नाही, तर काही वेळातच ही नावे समोर येतील.