- गोंदियात एक तर भंडाऱ्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू
- उस्मघाताचे देश भरात 50 बळी, कर्तव्यावर असलेले 25 कर्मचाऱ्यांचा समावेश.
गोंदिया, दि. 01 जून : सध्या नवतपा सुरु असुन सुर्य आग ओकत आहे. काल शुक्रवारी 31 मे रोजी गोंदिया जिल्ह्यात यावर्षीचा सर्वाधिक तापमान 45 अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली आहे. अश्यातच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव येथील सुरेश उरकुडा गेडाम (४५) याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
निमगाव येथील सुरेश गेडाम हे मतिमंद होते. सुरेशचा सांभाळ त्याची वयस्क आई करीत होती. कृती ठणठणीत असताना उन्हामुळे त्याची प्रकृती एकाएकी बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना खाजगी डॉक्टरांकडे नेले असता काही क्षणांतच सुरेशचा मृत्यू झाला. सुरेश गेडाम यांचा मृत्यू उष्ाघातामुळे झाला असावा असा संशय आरोग्य विभागाने वर्तविला आहे. तर तपास झाल्यानंतरच उष्ाघाताने मृत्यू झाला की नाही हे स्पष्ट सांगता येईल असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
भंडारा जिल्ह्यात उष्मघाताने एकाचा मृत्यू
गोंदिया भंडारा जिल्यात मागील दोन दिवसा पासून तापमानात कमालीची वाढ झाली असून उन्हाचा पारा 45 अंश सेल्सिअस वर पोहचला आहे. भंडारा जिल्ह्यात 30 मे रोजी एका इसमाचा उष्म घाताने मृत्यू झाल्याची माहिती वृत्तपत्रातून समोर आली आहे. तर नागरिकांनी घरा बाहेर पडू नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
उस्मघाताचे देश भरात 50 बळी, कर्तव्यावर असलेले 25 कर्मचाऱ्यांचा समावेश.
देशातील उत्तर व पूर्वेकडील राज्यांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. उस्माघाताने किमान 50 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये निवडणुकीच्या कामासाठी आलेल्या 25 कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश असल्याची माहिती लोकसत्ताने दिली आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, ओडीसा, झारखंड या राज्यामध्ये उष्णतेच्या लाट्यांमुळे अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिहार आणि ओडिसा या राज्यांमध्ये 24 जणांचा मृत्यू उष्णघाताने झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. देशामध्ये सध्या लोकसभांचे निवडणुका आहेत. असे असले तरी सकाळी 9 वाजता पासूनच लखलखता उन्हाचा पारा चढत आहे तर सायंकाळी 6 वाजता देखील कडक उन असते. अश्यात घरा बाहेर निघून कामे कशी करावी अशी चिंता वाटत आहे. काम करणारे देखील उन्हामुळे आजारी पडत असल्याचे चित्र आहे.