नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात एकाच पानवठ्यावर 5 वाघांचे दर्शन

गोंदिया, दि. 26 मे : तीव्र उन्हाच्या झडा मानवा सह प्राण्यांनाही बसू लागल्या आहेत. गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा वन वैभव समजल्या जाणाऱ्या नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पात एका पानवट्यावर 5 वाघांचे दर्शन एका सोबत झाले आहे. वन्यजीव प्रेमी यांनी या पाचही वाघांचा एक व्हिडिओ आपल्या कॅमेरात कैद केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे.

गोंदिया भंडारा हे दोन्ही जिल्हे लागून असल्याने या नवेगाव – नागझिरा व्याग्र प्रकल्पात नेहमीच वन्य प्राण्यांचे पर्यटकांना दर्शन होत असते. पर्यटक आपल्या कॅमेर्या मध्ये क्षणिक छायाचित्र टिपून ते सोशल मीडियावर देखील पसरवितात ज्या मुळे वन्य जीव प्रेमींना देखील याची माहिती मिळते.

गोंदियात वाढला उन्हाचा पारा. 

गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या उन्हाचा पारा 40 ते 44 अन्स सेलसियस च्या नाजिक पोहोचला आहे. लखलखत्या उन्हामुळे काम करणाऱ्या मजुवर्गांना देखील याचा फटका बसत आहे त्यामुळे काही भागातील मजूर वर्ग सकाळी 7 वाजता पासून तर दुपारी 11 वाजता पर्यंत काम करतात. त्यानंतर 4 वाजेनंतर 7 वाजेपर्यंत काम करतात. जिल्ह्यात लखलखता उन्हाचा तडाका असल्याने याचा फटका वन्यप्रान्याना देखील बसत आहे. थंडगार पाण्याचा आस्वाद घ्यावा असेही त्यांना वाटत आहे. उन्हाळा आला की नागरिक सरबत आणि उसाचा थंड रस देखील मोठ्या आवडीने घेतात.

पाण्याच्या शोधात वन्य प्राणी गावाच्या दिशेने

गोंदिया – भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील वन्य प्राणी पिण्याच्या पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने शेती मध्ये येतात. त्या मुळे व्याग्र प्रकल्प शेजारील शेतकरी आणि गावकरी वन्य प्राण्यांचे रोजच दर्शन करतात. भंडारा गोंदिया हे दोन्ही जिल्हे भाताचे जिल्हे म्हणून ओळखले जाते. असे असले तरी या भागात मका, ऊस, चना, गहू, एप्पल बोर, केळी बाग, टरबूज, काकडी, सह पालेभाज्या व अन्य शेतपिके देखील मोठ्या प्रमाणात घेतली जातात.

वन्य प्राणी शेतात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते, झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांना पाहिजे तशी भरपाई मिळत नाही. असे असले तरी शेतकऱ्यांना आपले मन मोठे करून राहावा लागते. कारण वन्य जीव आहे तर सजीव सृष्टी आहे. अशी समज असलेले शेतकरी या भागात आहे. पाहायला मिळतात.

 

Leave a Comment

और पढ़ें