खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर कॉग्रेस कार्यकर्ते नाराज, प्रदेश अध्यक्षांकडे करणार तक्रार

गोंदिया, दि. 25 जुन : भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे कॉग्रेस पक्षाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे निवडून आल्यावर ते गोंदिया जिल्यात प्रथमच आले. याची माहिती त्यांनी कॉग्रेस पक्षातील तसेच महविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत असून याची तक्रार कॉग्रेश प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे करणार असल्याचे पदाधिकऱ्यानी सांगितले आहे

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कॉग्रेस पक्षाचे डॉ प्रशांत पडोळे यांनी भाजप पक्षाचे खासदार राहिलेले सुनील मेंढे यांचा पराभव केला तर हि निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी झाल्याने या निवडणुकीत कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गट, शीव सेना उद्धव ठाकरे गट या तिन्ही मित्र पक्षांनी निवडणुकीत मेहनत घेत डॉ प्रशांत पडोळे याना निवडून आणले.

मात्र निवडून आल्यावर डॉ प्रशांत पडोळे हे गोंदियात आले असता त्यांनी जिल्हाधिकारी प्रजीत नायर, जिल्हा पोलिश अधीक्षक निखिल पिगळे, वैधकीय अधिष्ठाता तसेच व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेतली मात्र त्यांनी आपल्या आगमनाची माहिती कार्यकर्त्यांना दिली नसल्याने कॉग्रेसचे नेते पदाधिकरी नाराज झाले आहेत.

काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव अमर वऱ्हाडे आणि जितेंद्र कटरे जिल्हा परिषद सदस्य यांनी मिडीयाला तसी माहिती दिली आहे. डॉ. प्रशांत पडोळे हे नेत्यांच्या नव्हे तर कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर निवडणुकीत जिंकून आले असून त्यांना आमचं विसर पडल्याने डॉ. पडोळे याची तक्रार कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे करणार आहेत. तर चर्चा आहे की मीडियाची ची पण मला गरज नाही असे नव निर्वाचित खासदार म्हणतात त्या मुळे भंडारा गोंदियातील जनतेने चुकीच्या उमेदवाराला तर निवडून दिले नाही ना असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें