वैद्यकीय अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात, तक्रारदाराचे बिल काढून देण्यासाठी मागितली ८ टक्के लाच

गोंदिया, दि. २५ जुन २०२४ : आरोपीने तक्रार दाराचे बील ६ लाख ०७ हजार ३२० रुपये रकमेवर ८% प्रमाणे ४८ हजार रुपये ईतक्या लाच रकमेची मागणी केल्या मुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज दि. २४ जुन रोजी कारवाई केली आहे. आरोपी डॉ. अंबर श्रीराम मडावी वय ४४ वर्ष, पद – वैद्यकीय अधिकारी, ( वर्ग – २ ) नेमणूक आयुर्वेदिक दवाखाना, बाराभाटी, अतिरिक्त कार्यभार – प्राथमीक आरोग्य केंद्र महागाव, ता. अर्जुनी मोरगाव असे आहे. 

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहिती नुसार सापळा कार्यवाही दि. ११ जुन व १२ जुन रोजी लाच रक्कम ६० हजार रुपयाची मागणी केली आहे, ६ लाख ७ हजार ३२० रूपये रकमेवर १०% प्रमाणे टक्केवारी मागितली आहे. तर तडजोडीअंति लाच ४८ हजार रुपये ८% प्रमाणे देणे ठरले मात्र तक्रारदार यांना लाच रक्कम द्याची इच्या नसल्यामुळे त्यांनी एसीबी कडे तक्रार दाखल केली, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, अर्जुनी मोरगाव येथे लाच प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 

तक्रारदार हे प्राथमीक आरोग्य केंद्र महागाव येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असून त्यांच्या वेतन निश्चिती, नक्षलभत्ता / प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकी च्या फरकाचे रू ६ लाख ७ हजार ३२० रुपये रकमेचे बील स्वाक्षरी करून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांच्या कार्यालयात पाठविण्या करीता बिलाच्या रकमेवर १०℅ प्रमाणे ६० हजार रुपये लाच मागणी करीत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती.

लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपीने तक्रार दाराचे बील ६ लाख ०७ हजार ३२० रुपये रकमेवर पंचासमक्ष ८% प्रमाणे ४८ हजार रुपये ईतक्या लाच रकमेची मागणी करुन लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव येथे आज दि. २४ जुन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास काळे पोलीस उप अधीक्षक, पोनी अतुल तवाड़े, पो.नि. उमाकांत उगले, पो.हवा. संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, मनापोशी संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें