बकरी चोर आरोपी फरार, रावणवाडी पोलीस स्टेशन कडून शोध सुरू

( आरोपी फोटो )

गोंदिया, दि. २५ जुन २०२४ : रावणवाडी पोलीस स्टेशन येथे २०२३ मध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी फरार असल्याने त्याचे शोध सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन रावणवाडी यांच्याकडून सदर माहिती मीडिया मध्ये प्रसारित होण्यासंबंधाने पुरवली आहे.

पोलीस स्टेशन रावणवाडी येथे गुन्हा क्रमांक – 392/2023 कलम 379/34 भादवी अन्वय गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून घटनास्थळ ग्राम कोरणी येथील आहे. दि. १७/१२/२०२३ रोजी चोरी झाली असून तक्रार दखल दिनांक : १९/१२/२०२३ असे आहे.

फिर्यादी यांच्या जमनापारी जातीच्या पांढऱ्या रंगाच्या शेळीचे पिल्लू किंमत अंदाजे २० हजार रुपये असे असून फिर्यादी यांचे घराचे समोरील शेडच्या आवारातून आरोपी नामे राहुल कमल भोयर वय अंदाजे २६ वर्ष राहणार कोरणी तालुका जिल्हा गोंदिया याने चोरी करून नेल्याने व त्याचे दोन सहकार्यांसोबत त्या शेळीच्या पिल्लू यास कापून घरी खाण्याकरिता घेऊन आला असता मिळून आल्याने फिर्यादीच्या तोंडी खबरे वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासावर आहे.

सदर गुन्यातील आरोपी राहुल कमल भोयर वय २६ वर्ष रा. कोरणी हा घटने तारखेपासून फरार असून त्याचा शोध घेतला असता आज पावेतो मिळून आला नाही. माहिती मिळाल्यास खालील नमूद क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान पोलिसांनी केले आहे. संपर्क क्र : ०७१८२२७००३३ तपासी अमलदार पोहवा किशोर शरणागत/१५०३, मो. क्र. ८७८८०१४१९७ पोस्ट रावणवाडी.

 

Leave a Comment

और पढ़ें