शासकीय रक्तपेढीत जाणवतोय रक्ताचा तुटवडा, स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन.

गोंदिया, दि. 19 मे 2024 : बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय येथील रक्तपेढी ही जिल्ह्यातील एकमेव अशी शासकीय रक्तपेढी असून शासकीय रक्तपेढ्यांमध्ये सुमारे 8 ते 10 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. रक्ताची भीषण टंचाई पाहता रक्त दात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

गोंदिया येथे शासकीय आणि खासगी रुग्णालयातून अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी अनेक खासगी रुग्णालये आहेत. यामुळे जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील रुग्णही येथेच उपचारासाठी येतात. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते.

याशिवाय, सिकलसेल, थॅलेसेमिया, कॅन्सर बाधि रुग्णांना नियमित रक्त द्यावे लागते. त्यांना रक्तपुरवठा करण्यासाठी शासकीय रक्तपेढी सोबतच खासगी ब्लड बँकही आहे. यामध्ये शासकीय रक्तपेढीची स्थिती बघितल्यास तेथे सुमारे 8 ते 10 दिवस पुरणार एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. उन्हाळ्यात नागरिक रक्तदानासाठी पुढे येत नाहीत. शिवाय, सध्या रक्तदान शिबिरांचे आयोजनही बंद पडले आहेत. यामुळे रक्तपेढीला रक्ताचा पुरवठा बंद झाला असून स्थिती कठीण आहे.

शहरात अनेक अद्ययावत खासगी रुग्णालये आहेत. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यापासून येथे जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील रुग्ण ही उपचारासाठी येतात. त्यामुळे येथे दररोज सुमारे २० ते २५ युनिटची मागणी असते. मात्र, त्या तुलनेत ब्लड संकलित होताना दिसून येत नाही.

परिणामी रक्ताची टंचाई नेहमीच दिसून येत असते.
रक्तपेढीला दररोज २० ते २५ युनिटची आवश्यकता असते. त्या तुलनेत रक्त संकलित होण्याचे प्रमाण कमी असते. सद्यस्थितीत जिल्ह्यात सुमारे 8 ते 10 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. रक्तदान श्रेष्ठदान असल्याने सामाजिक संस्था तसेच रक्त्तदात्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे असे आवाहन – डॉ. संजय माहुले, शासकीय रक्तपेढी प्रमुख, मिरा सोनुने ( रक्त संक्रमण अधिकारी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया) यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. 

Leave a Comment

और पढ़ें