भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक एक जखमी तर एक जागीच ठार

सडक अर्जुनी, दि. 17 मे : गोंदियातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 वर आज 17 मे रोजी सकाळी 08 : 15 वाजता एका भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने यात एकाचा मृत्यू झाला तर एक 15 वर्षीय मुलगा अपघातात जखमी झाला आहे. चंद्रशेखर साखरे वय (45) मुक्काम कोहमा तालुका सडक अर्जुनी हे आपल्या दुचाकीने कोहमारावरून देवरी कडे जात होते.

दरम्यान नागपूरकडून रायपूर कडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने डोंगरगाव जवळ त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली. यात दुचाकीस्वार चंद्रशेखर साखरे हे कंटेनरच्या चाकाखाली आले दरम्यान त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने डोक्याचा चक्काचुर झाला. त्या मुळे साखरे यांचे जागीच मृत्यू झाले.

तर त्यांचा 15 वर्षीय मुलगा मासूम हा जखमी झाला असुन त्याला उपचारासाठी देवरी येथे दाखल करण्यात आले. यात मृतकाची मोटर सायकल स्कूटी क्र : एम.एच. 35 ए.एफ. 3198 असे असून अपघात करणारे ( ट्रक ) कंटेनर क्र : एम.एच. 29 बी.एफ. 6960 असे आहे. सदर घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनस्थळ गाठून जखमीला रुग्णालयात दाखल केले असून पुढील कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत भुते हे करीत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें