अशोक बनकर यांची जालना येथे बदली तर नित्यानंद झा. हे नवे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रूजू


गोंदिया, दी. 24 नोव्हेंबर 2023 : वर्ष 2019 तुकडीचे (I.P.S.) अधिकारी नित्यानंद झा, यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आलेली असून अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांचे ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. दि. 23 नोव्हेंबर रोजी नव्याने रुजू झालेले नित्यानंद झा,(I.P.S.) यांनी अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया पदाचा पदभार अशोक बनकर यांच्या कडून स्विकारला आहे.नु

कतेच दिनांक 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शासन गृहविभागाने पोलीस दलातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. त्यात गोंदिया चे अप्पर पोलीस अधीक्षक, अशोक बनकर, यांचा गोंदिया जिल्ह्यातील दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने. त्यांची बदली पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना येथे करण्यात आली असल्याने त्यांच्या ठिकाणी नित्यानंद झा, यांची नवे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, यांच्या संकल्पनेतून नक्षलग्रस्त अतिदुर्गम आदिवासी भागातील गोरगरीब जनतेच्या हिताकरिता राबविण्यात येत असलेले कम्युनिटी पोलीसिंग, पोलीस दादालोरा खिडकी योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे नावीन्य- पूर्ण उपक्रम राबवून देवरी, सालेकसा, अर्जुनी- मोर, तालुक्यातील आणि गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांना सोयी सुविधा मिळवून देण्यात  अशोक बनकर, अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया म्हणून सिंहाचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें