देवरी ग्रामीण रुग्णालयाचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण.


  • इमारत सुसज्ज होण्यापूर्वीच लोकार्पण झाल्याने स्थानिक आमदारांनी पालकमंत्र्यांवर श्रेय लाटण्याचा केला आरोप. यापूर्वी आमदार कोरोटे यांनी केला होता या रुग्णालयाचा लोकार्पण.

गोंदिया, दी. 27 ऑक्टोंबर : जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुका अशी ओळख असलेल्या देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते पार पडला. देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारती 50 वर्ष जुनी असून इमारत अत्यंत जीर्ण झालेली आहे. त्यामुळे त्या जीर्ण इमारतीमध्ये रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जीव मुठीत घेऊन आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा लागतो. त्यामुळे नागरिकांची समस्या लक्षात घेता स्थानिक आमदार सहसराम कोरोटे यांनी 15 ऑगस्ट रोजी नव्या इमारतीमध्ये तात्पुरता लोकार्पण करून रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी केली होती मात्र.

त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रुग्णालय अद्यावत व्हायचे आहे त्यामुळे इथं आरोग्य सुविधा देता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र आता पुन्हा गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री धर्मरामबाबा आत्राम पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेला आहे. मात्र अद्यापही विद्युत तसेच सर्व सुविधायुक्त मशीन व फर्निचर न आल्याने रुग्णालय सुसज्ज होण्यापूर्वीच लोकार्पणाची एवढी घाई का ? असा प्रश्न स्थानिक आमदार कोरोटे करून यांनी उपस्थित केला आहे. तर सध्या फक्त बाह्य रुग्ण विभाग या ठिकाणी शिफ्ट करत आहोत आंतर रुग्ण विभाग शिफ्ट व्हायला आणखी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागेल असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें