सडक अर्जुनी, दि. 20 ऑक्टोंबर : सत्कार सोहळ्यामधील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी सडक अर्जुनीच्या विशेष सहभागाने जिल्ह्यातील संघ महीला आघाडीला नवा आदर्श मिळेल असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी महिला संघाला शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा सडक अर्जूनीच्या वतीने दरवर्षी शिक्षक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षीही ज्या जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी नवोदय विद्यालय नवेगाव बांध व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला पात्र झालेल्या शाळांच्या सत्कारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दि १७/१०/२०२३ रोज मंगळवारला आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन अल्लाउद्दीन राजानी पंचायत समिती सदस्य सडक अर्जुनी यांच्या हस्ते व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन जिल्हा परिषद सदस्या कविता ताई रंगारी यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पंचायत समिती सडक अर्जुनी चे उपसभापती शालिंदर कापगते यांनी अध्यक्षीय स्थान भुसविले तर विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाचे अध्यक्ष किशोर बावनकर, पी एम मेश्राम अध्यक्ष, सुरेश अमले सरचिटणीस, हुमेंद्र चांदेवार कार्याध्यक्ष, सोमेश्वर मेश्राम जिल्हा संघटक, ओ. बी. मेश्राम, जिल्हा संयोजक, विजयकुमार डोये संचालक ग्राहक सोसायटी, गोंदिया/भंडारा पेंदाम साहेब, केंद्रप्रमुख केंद्र- कोकणा/ जमी, ए.टी. लंजे, पदवीधर शिक्षक गिरोला, कापगते सर पदवीधर शिक्षक कोहमारा, विमल ताई उपरीकर मॅडम जिल्हा प्रतिनिधी, उईके मॅडम, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षक सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमच्या तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा करुणा उपरकर मॅडम यांनी केले. शिक्षकांना शिकवू द्या विद्यार्थी घडवू द्या. या विषयावर कडुकर सर बकी यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. नवोदय विद्यालय प्रवेश 2022-23 ला निवड झालेल्या आणि शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषद व्यवस्थापनेतील शाळेचे मुख्याध्यापक आणि मार्गदर्शक शिक्षक यांना मोमेंटो व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
किशोर बावनकर जिल्हाध्यक्ष यांनी शाळांच्या खाजगीकरणावर शासनाची उदासीनता आणि आमच्या प्राथमिक शिक्षकांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी तत्पर आहेत, असे सर्व शिक्षकांच्या वतीने जाहीरपणे सांगितले. अल्लाउद्दीन राजानी पंचायत समिती सदस्य, कुमारी कविताताई रंगारी जिल्हा परिषद सदस्या यांनी उपस्थित शिक्षक बंधू- भगिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन महिला आघाडीच्या उपाध्यक्षा कु. रजनी शिवणकर मॅडम यांनी केले.
तर पाहुण्यांचे आभार महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा कु. मंगला सूर्यवंशी मॅडम यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित झालेल्या सर्व सत्कारमूर्ती शाळेचे मुख्याध्यापक आणि मार्गदर्शक शिक्षक आणि तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आणि महिला आघाडी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया च्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा सडक अर्जुनीचे सर्व संघ पदाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी साठी अधिक मोलाचे सहकार्य केले.