चीलम मध्ये गांज्या भरून वोढनाऱ्या आठ लोकांवर गुन्हा दाखल


गोंदिया, दी. 19 ऑक्टोंबर : चिलममध्ये अंमली पदार्थ गांजा चा वापर करून सेवन करणाऱ्या आठ इसमांविरुद्ध पो. स्टे. रामनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पो.स्टे. रामनगर येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार दि. 17 ऑक्टोंबर रोजी नवरात्र उत्सव निमित्ताने हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सायंकाळी चे सुमारास इंजीनियरिंग कॉलेज च्या मागील बाजूस स्मशान भूमि परिसरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी एकूण 08 इसम स्वतः जवळ अवैधरित्या नशायुक्त पदार्थ गांजा बाळगून, चिलममध्ये गांजा टाकून, ओढताना व नशा करताना मिळून आले.

सदर प्रकरणी आरोपी नामे : 1) दीपांशु धारासिंग चौहान , वय 22 वर्षे, 2) नोवेल अंथोनी सायमन, वय 22 वर्ष, 3) रोनित नैनसिंग मरसकोल्हे, वय 21, 4) हर्ष छविंद्र वाघमारे वय 21 वर्ष, 5) धनंजय उर्फ अमन रमन ऊके वय, 21 वर्ष , 6) हर्षल प्रदीप घोडेस्वार वय 25 वर्ष , 7) वैभव महेंद्र भगत वय 20 वर्ष , 8) प्रशांत जयेंद्र दमाहे वय 20 वर्ष रा. सर्व गोंदिया येथील रहिवासी आहेत.

असे आठ आरोपी यांचे विरुद्ध पो. ठाणे रामनगर येथे कलम 27 अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सदरची कारवाई वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली पो. ठाणे रामनगर पो. नि. संदेश केंजळे , सपोनि राजू बस्तवड़े, पोहवा राजेश भूरे, पोहवा सुनिलसिंग चौहान, पोहवा छत्रपाल फुलबान्धे, पोना बालकृष्ण राउत, पो. शी. कपिल नागपुरे, यांनी केली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें