चाबी दुरुस्ती करणारा; दागिने चोर आरोपी पोलिसांच्या ताब्यात!


गोंदिया, दी. 13 सप्टेंबर 2023 : पोलीस ठाणे गोंदिया शहर येथील रहिवाशी तक्रारदार सौ. ममता खटवाणी रा. वाजपेयी वार्ड, सिव्हील लाईन, गोंदिया यांचे घरी दि. 21/08/2023 रोजी फिर्यादी यांनी रस्त्यावर फिरणारा चाबी दुरुस्ती करणारा अनोळखी इसमास आपले राहते घरी लोखंडी आलमारीचे लाँक दुरुस्ती करण्याकरीता घरामध्ये बोलावले असता, सदर अनोळखी इसमाने आलमारीचे लाँक दुरुस्ती करीत असतांना आलमारी मध्ये ठेवलेला एकुण 220 ग्रँम सोन्याचे दागिने चोरुन घेऊन गेला अशा फिर्यादी चे रिपोर्टवरुन पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे अपराध क्रं. 564/2023 कलम 380 भा.द.वी. अन्वये दाखल करण्यात आला होता.

या अनुषंगाने नमुद गुन्हयाचे घटनास्थळास भेट देवून फिर्यादी यांना सविस्तर विचारपुस करून घटनास्थळा जवळील सी. सी.टी. व्ही फुटेज ची पाहणी, आरोपीचे प्राप्त सी. सी. टी. व्ही फुटेज आणि तांत्रीक विष्लेशन करण्यात आले. प्राप्त माहीतीच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशिर माहीती वरून आरोपी हा हॉटेल सेंट्रल पॉईट श्री टॉकीज रोड गोंदीया येथे थांबलेला असल्याबाबद माहीती झाली. तसेच आरोपी हा उधना जि. सुरत, राज्य गुजरात येथील असल्याचे माहीती मिळाल्याने पोलीस पथकास रवाना करण्यात आले. आरोपी नामे गुरुबिर धिरसिंग सिंग वय 31 वर्ष. रा. बापुनगर, उधना, जि. सुरत, राज्य गुजरात यास मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यात कातीया येथे राहत असल्याचे समजल्याने तेथे जावून पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतले. सदर शंसयीत अरोपीत इसमास ताब्यात व विश्वासात घेऊन गुन्ह्यासबंधाने विचारपुस केली असता, त्याने ताला दुरुस्तीचे कामाने गोंदिया येथे आल्याचे व दि. 21/08 /2023 रोजी उपरोक्त गुन्हा चोरी केल्याचे कबुल केले.

नमूद आरोपींचे ताब्यातुन एक मोबाईल हँडसेट व एकूण 173.5 ग्रॅम पिवळ्या धातूचे दागिने असा एकूण किंमत 11,68,600/- रुपयांचा मुद्देमाल गुन्ह्यात हस्तगत करुन जप्त करण्यात आला आहे. सदरची उल्लेखनिय कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांचे नेतृत्वात, सपोनि. विजय शिंदे, पोउपनि महेश विघ्ने, मपोउपनि वनिता सायकर, पोहवा. राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, महेश मेहर, इंद्रजीत बिसेन, चित्तंरजन कोडापे, चेतन पटले, पोशी संतोष केदार, पो.शी. हंसराज भांडारकर, चापोहवा लक्ष्मण बंजार व चापोशी घनश्याम कुंभलवार, तसेच सायबर सेलचे पोहवा. दिक्षीत दमाहे, धनंजय शेंडे, संजय मारवाडे, यांनी कामगिरी केली आहे. सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें