गोंदिया, दी. 13 सप्टेंबर 2023 : गोंदिया तालुक्यातील श्रीराम अभिनव धान खरेदी केंद्रामध्ये धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरापुढे आंदोलन पुकारले होते. तब्बल ३६ तास चाललेल्या या आंदोलनाला आमदार विनोद अग्रवाल यांनी ४ तारखेचे वचन देऊन आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. त्याला मान देत आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले होते. आमदार विनोद अग्रवाल यांनी शब्द पाळल्यामुळे जवळपास ४०० पेक्षा अधिक शेतकरी बांधवांचे ३ कोटी ५० लक्ष रुपये देण्याचे आदेश पत्रकाद्वारे दिनांक ५ सप्टेम्बर २०२३ ला काढण्यात आले होते. त्या नंतर २ ते ३ दिवसात शेतकरी बांधवांच्या मोबाईल वर पैसे जमा होण्याचे संदेश प्राप्त होताच शेतकरी बांधवांनी आमदार कार्यालय गाठून आमदार विनोद अग्रवाल यांचे अभिनंदन केले.
असा होता घटनाक्रम…
२९ ऑगस्ट आमदार विनोद अग्रवला यांच्या घरासमोर शेतकरी आंदोलन सुरु , ३० ऑगस्ट आमदार विनोद अग्रवाल यांच्या विनंतीपर सायंकाळी शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले, ४ सप्टेंबर मुख्यमंत्री महोदयांनी फाईलवर सही केली, ५ सप्टेंबर शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले, ८ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली, ‘अन्न दाता सुखी भव’ हे भाव माझ्या मनात असून मी सदैव शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभा असल्याचे सुतोवाच आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.