“केंद्रातलं सरकार” येड्यांच्या जवळ आहे : काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले


  • ओबीसी आणि मराठा मध्ये भांडण लावण्याचे काम सरकार करते.
  • जनसंवाद यात्रेत नागरिकांचा उ्स्फूर्त प्रतिसाद!

सडक अर्जुनी, दी. 10 सप्टेंबर : महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र अद्याप पर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा निघालेला नाही. यावर नाना पटोले यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. “केंद्रातलं सरकार येड्यांच्या जवळ आहे. येडेपणा करू नये. ओबीसी आणि मराठा मध्ये भांडण लावण्याचे काम सरकार करते. आणि सरकारने हा जो वाद निर्माण केला आहे. मत घेण्यासाठी तो वाद मिटवला पाहीजे. आणि नसेल जमत तर केंद्रातला आणि राज्यात सरकार आमच्या हाती द्या. आम्ही दोन महिन्यांमध्ये सर्व प्रश्न मार्गी लावून देऊ” असे यावेळी नाना पटोले म्हणाले.



गोंदिया जिल्ह्यात 3 सप्टेंबर पासून काँग्रेस पक्षाची जनसंवाद यात्रा सुरु झाली असून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज 10 सप्टेंबर रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम पांढरी येतून जनसंवाद यात्रेत हजेरी लावत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत. भाजप शेतकऱ्यांवर व बेरोजगांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत. आपल्याला पुन्हा स्वतंत्रपणे जगायचा असेल तर देशात आणि राज्यात काँग्रेस पक्षाला निवडून द्या. हे दुसरं महायुद्ध आहे. असं समजुन कामाला लागा. असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे जनसंवाद यात्रे दरम्यान कोसमतोंडी गावातील सभेत मंचावरून बोलत होते. गावात यात्रा पोहचताच नाना पटोले यांचा जंगी स्वागत करण्यात आला. यावेळी तालुक्यातील आणि जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर जनसंवाद यात्रेला 3 सप्टेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गोंदिया जिल्ह्यामध्ये जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांनी सर्व धर्माची लोक एकत्र नांदली पाहिजेत. लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत. मोदी सरकारचा खरा चेहरा लोकांमध्ये पोहचला पाहिजे यासाठी ही जनसंवाद यात्रा काढत आली असल्याचे नाना पटोले म्हणाले यावेळी यात्रेला नागरिकांनी चांगली हजेरी लावली होती.


 

Leave a Comment

और पढ़ें