सडक अर्जुनी तालुक्यात वाढली ड्रॅगन फ्रूट ची विक्री!


गोंदिया, ( बबलू मारवाडे ) दी. 06 सप्टेंबर : गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असला तरी जिल्ह्यात आता ड्रॅगन फ्रूट चे उत्पादन होत आहे. त्याच बरोबर त्याची विक्री देखील वाढली आहे. गोंदिया जिल्हा अंतर्गत येणारे सडक अर्जुनी तालुका हे भाग ग्रामीण भाग आहे. असे असले तरी या भागात ड्रॅगन फ्रूट ची विक्री होत अश्ल्याचे चित्र गेली अनेक दिवसांपासून पाहण्यसाठी मिळत आहेत. एका विक्रेत्याने सांगितले की तब्बल तीन वेळ आपण या फळाची खेप विक्री करिता या भागात आणली आहे. त्यामुळे आचार्य! वेक्त होत आहे. या फळाची आज बाजारात 200 रुपये किलो ने विक्री होत आहे. असे असले तरी नागरिक हा फळ खरेदी करतात.



ड्रॅगन फ्रूट हे सुपरफ्रूट मानले जाते. कारण ते आरोग्यासाठी खूप चांगले असते. या फळाचे सेवन केल्यास मधुमेह आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो असे म्हटले जाते. ड्रॅगन फ्रुटमध्ये अँटी- ऑक्सिडंट्स, फायबर्स आणि व्हिटॅमिन सी आढळतात. हे अनेक गंभीर आजार बरे होण्यास मदत करतात. ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

साधारणपणे लोक ड्रॅगन फ्रूटला चीनचे फळ मानतात पण असे नाही. जरी ड्रॅगन फ्रूटचे मूळ मेक्सिकोमध्ये असल्याचे मानले जात असले तरी. आज ते जगाच्या विविध भागांमध्ये उत्पादित केले जाते. ड्रॅगन फ्रूट हायलोसेरस नावाच्या कॅक्टसवर वाढते. ड्रॅगन फ्रूट हे पोषक तत्वांनी युक्त अन्नपदार्थ आहे. याचे सेवन करण्याचे अनेक फायदे असल्याचे इंटरनेट वर आपण पाहू शकतो.

तीर्थराज हिरामण बडोले हे सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहळीटोला येथील एक लहान व्यापारी आहेत. ते वर्षभर वेग वेगळ्या फळांची खरेदी करून कोहमारा मार्गावर दुकान लाऊन विक्री करतात. त्यांनी सांगितले की ड्रॅगन फ्रूट हे फळ आपण विक्री करिता तीन वेळ एक – एक क्विन्टल आणले आहेत. तिरोडा येथील एका शेतकर्याच्या शेतातून आपण हे फळ आणले आहेत. आणि तिन्ही वेळ ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्याची विक्री चांगल्या रेटने झाली. खाण्यासाठी देखील उपयुक्त आहे. दरम्यान त्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी देखील पाहण्यासाठी मिळाली. सध्या ( भोम्बोडी ) सात्यांचा सीजन आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें