शेंडा येथे कृषि विभागा मार्फत शेतकरी योजना मेळावा व मार्गदर्शन.


सडक/अर्जुनी, दि. 24 ऑगस्ट : तालुक्यातील ग्राम शेंडा / कोयलारी अंतर्गत येणारे कृषि सहायक राजशेखर राणे मार्फत शेतकर्यांना कृषि योजना बाबत मार्गदर्शन 24 रोजी करण्यात आले. कृषि विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात कृषि योजना माहिती मेळावा घेऊन शेतकर्यांना महा डी बी टी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, प्रधानमंत्री सम्मान निधी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा, फळबाग लागवड, ठिबक सिचन, शेततळे, अश्या बर्याच योजना कश्या पद्धतीने शेतकर्यांच्या फायद्याची आहे.

असे मार्गदर्शन तालुका कृषि अधिकारी कु. किरण बडोले यांनी शेतकरी योजना मेळावा मध्ये शेतकऱ्यांना करत आहेत. कोयलारी चे कृषि सहाय्यक राजशेखर राणे यांनी शेंडा या आधिवासी क्षेत्रात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत शेतकर्यांनी भाग घ्यावा या साठी स्व: ता या सर्व विषयावर शेतकर्यांना मार्गदर्शन केले. तसेच सोबत च संघणक चालकाच्या मदतीने शेतकर्यांचे अर्ज भरण्याचे काम करून घेतले. शेतकर्यांनी नवीन रुजू झालेले कृषि सहाय्यक राजशेखर राणे यांचे गावात स्वागत करून कमाचे कौतुक केले.

या प्रसंगी दीपक लिल्हारे संघणक चालक, सुबोध खोब्रागडे विमा प्रतिनिधी, शुभम मेश्राम संघणक चालक, धनलाल मानवटकर, नारायण पंधरे, तुळशीदास पंधरे, शैलेश ऊईके, दीपक बांते, संजय मानवटकर, प्रल्हाद बोरकर, रामलाल मरसकोल्हे, सुधाकर संयाम जीरालाल मेश्राम, सोमा वटी, सेवकराम परतेकी, मोहनलाल रामटेके, संदीप सोनवणे,  राकेश वरखडे, चैत्राम मरसकोल्हे, योगेश दशरिया, रजनीकांत वालदे सरपंच कोयलारी, हेमू वालदे सामाजिक कार्यकर्ते, शिवलाल चौधरी, इनसाराम कोवाचे, सिद्धार्थ बडोले, राजू वालदे, गोकुळ तरोने, टेकचंद कोहळे, आशिष बडोले, रणजित कोहळे, देवानंद गहाने, धनलाल परशुरामकर उपस्तीत होते.


 

Leave a Comment

और पढ़ें