- दिव्य ज्योति जाग्रुति संस्थान व ग्रा. पं. गोटाबोडी तर्फे वन महोत्सव साजरा
लोहारा, देवरी, दि. २४ आगस्ट : भव्य वन मोहत्सव कार्यक्रमाचे आयोजन दि. २३ आगस्ट रोजी ग्राम गोटाबोडी येथे करण्यात आले होते. त्यात प्रमखु उपस्थिती म्हणून दिव्य ज्योति जाग्रुति संस्थान चे महाराष्ट्र प्रमुख स्वामी चिदानंद, तसेच ग्रामपंचायत, गोटाबोडी चे सरपंच मनोहर राऊत, दिपक बावनथळे उपसरपंच, श्रीमती कल्पनाताई वालोदे जि. प. सदश्या, प्रविण डांगे पोलीस निरीक्षक, सोनकुसरे वणपरीक्षेत्र ( सा. वनी. ) अधिकारी, कांबळी साहेब वनपाल, देशमुख साहेब ग्राम विकास अधिकारी, कारेमोरे पोलीस पाटील, डॉ. खंडागळे मडॅम, डॉ. बिसेन मडॅम, तसेच दिव्य ज्योति जाग्रुति संस्थान चे प्रचारक साध्वी हिरा भारती, साध्वी माधुरी भारती, गुरुभाई उत्तरेश्वरजी व सर्व दिव्य ज्योति जाग्रुति संस्थान परिवार तसेच अनेक पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
वन मोहत्सव दरम्यान दिव्य ज्योति जाग्रुति संस्थान चे सर्व सदश्य गावकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात व्रूक्षरोपण करण्यात आले. त्यामध्ये अनेक रोपटे जसे आंबा, शिशम, जाभुंळ, करंजी, सिताफळ, वड, पिंपळ, आवडा असे वक्षृ लावण्यात आले व अश्या प्रकारे कार्यक्रम जो समाजाला लाभकारी होईल असे कार्यक्रम नेहमी दिव्य ज्योति जाग्रुति संस्थान तर्फे घेतले जातात. ह्या वन मोहत्सवामध्ये दिव्य ज्योति जाग्रुति संस्थान व ग्रा. पं. गोटाबोडी द्वारे १००१
व्रूक्षाची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला स्वामी चिदानंद यांचे विशेष मार्गदर्शन करतानी जगतगुरु संत श्री. तुकाराम महाराजांचा उदाहरण देत असतानी सांगितले की, “वक्षृ वल्ली आम्हा सोयरे वनचरे, आपले खरे सोयरे, मित्र जर असणार तर वन, झाड असणार व आपले पुढील भववष्ट्य सुरक्षित असेल.” असे प्रकाश टाकले. तसेच गोटाबोडी चे सरपंच मनोहर राऊत यानी सुध्दा मोलाचे मार्ग दर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वाधिक सहकार्य मिळाले.