सालेकसा, दि. 20 ऑगस्ट :भारतीय स्वातंत्र्य दिनी पोलीस मुख्यालय कारंजा, गोंदिया येथे आयोजीत मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र भजेपारला ‘सुंदर माझा दवाखाना’ हा तालुका तालुकास्तरीय पुरस्कार जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रदान करून कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी तथा सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित खोडनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्राचे सीएचओ डॉ. दिनेश कटरे, आरोग्य सेवक प्रदीप वाघमारे, आरोग्य सेविका विद्या बहेकार बोहरे, आशा सेविका रामिता ब्राह्मणकर, विणू खांडवाये, छाया वाढई, ममता बोहरे, गायत्री खरवडे यांनी सुंदर माझा दवाखाना अभियानाला यशस्वी करण्यासाठी आणि दवाखाना स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
दरम्यान प्रत्येक रविवारी चालणारी भजेपार ग्राम वासियांची स्वच्छता मोहीम या मोहिमेसाठी मोलाची ठरली असे मत डॉ. दिनेश कटरे यांनी व्यक्त केले आहे. पुरस्कार प्राप्तीबद्दल उपकेंद्राच्या सर्व कर्मचारी वर्गाचे ग्राम पंचायत भजेपारच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.