कु. रक्षा हिरदीलाल ठाकरे हीने चिमुकल्यांसोबत साजरा केला जन्मदिवस…


नागपुर, दि. 16 ऑगस्ट : मूळचे गोंदिया जिल्ह्यातील भजीयापार येथील असलेले हिरदीलाल ठाकरे पोवार समाज एकता मंच चे सल्लागार असून अखिल भारतीय क्षत्रिय पोवार, पंवार माहासंघाचे राष्ट्रीय संगठन सचिव आहेत.

आपल्या मुलींच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षाला जिल्हा परिषद शाळेतील मुलामुलींना कधी स्कुल बैग वाटप, कधी गरीब गरजू लोकांना निशुल्क चष्मा वाटप, कधी अपंग लोकांना उपयोगी पडणारा साहित्य तर कधी शालेय शिक्षा साहित्य वाटप व कधी रक्तदान शिबीर असे अनेकानेक उपक्रम राबवत असतात.

वडिलांच्या याच पावलांवर पाऊल ठेवत जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जानावा या उक्तीप्रमाणे खरा माणूसकी धर्म जपत कु. रक्षा ठाकरे हिने अनाथ चिमुकल्यांसोबत आपला जन्मदिवस साजरा केला.

संस्कार व संस्कृतिचे संवर्धन करणारी कु. रक्षा हिरदीलाल ठाकरे नागपुर हिचा जन्मदिवस आरंभ बहुउद्देशीय संस्था अनाथ आश्रम बोपापुर वर्धा येथील अनाथ असलेल्या चिमुकल्या बरोबर साजरा करुन आपल्या आई बाबाचा मान उंचवून सार्वजनिक परंपरा कायम ठेवली.

त्याबद्दल कु. रक्षा हिरदीलाल ठाकरे चा कौतुक करत आई बाबांनी व सर्व पोवार समाज बांधवांनी तीला जन्मदिनाच्या अनेकानेक शुभेच्छा दिल्या. कु. रक्षा हिने केलेल्या या स्तुत्य उपक्रमाची चर्चा सर्वत्र होऊ लागली असून तीच्यावर शुभेक्षांचा वर्षाव होत आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें