अखेर आमदार सहसराम कोरोटे यांनी केले देवरी ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण…


  • लोकार्पणाच्या मुद्द्यावरून रंगला होता आजी-माजी आमदारात कलगीतुरा… 

गोंदिया, दिनांक : १५ ऑगस्ट : देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीवरून काँग्रेसचे विद्यमान आमदार सहषराम कोरोटे व भाजपचे माजी आमदार संजय पुराम यांच्यात मागील दोन दिवसांपासून चांगलाच कलगीतुरा रंगला होता. या वादाला आज अखेर पूर्णविराम बसला असून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे यांनी या इमारतीचे लोकार्पण केले आहे.



देवरी येथे १२ कोटी ५० लाख रुपये खर्चून ग्रामीण रुग्णालयाची इमारत तयार करण्यात आली. पण या इमारतीत फर्निचरची कामे होण्यास दोन महिने लागणार आहेत. त्यामुळे ही कामे झाल्यावरच ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण करू देणार, अशी भूमिका भाजपचे माजी आमदार संजय पुराम यांनी घेतली होती. तर ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण झाली असून या इमारतीतून कारभार चालविणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ करणे असे आहे.

नवीन इमारत बनली असून या इमारतीचे लोकार्पण आज १५ ऑगस्ट २०२३ रोजी करून रुग्णांची गैरसोय दूर करणार असल्याची भूमिका आमदार सहषराम कोरोटे यांनी घेतली आणि अखेर आज स्वातंत्र्य दिनाचे औचित साधून आमदार कोरोटे यांनी या रुग्णालयाचे लोकार्पण केले आरोग्यमंत्र्यांना भेटून लवकरच या रुग्णालयात रुग्णांना उपचार देण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन आमदार कोरोटे यांनी दिले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें