बंदिस्त 49 जनावरांची सुटका; 2 लाख 45 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त!


गोंदिया, दि. 14 ऑगस्ट : गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुका अंतर्गत येणारे ग्राम टेभूटोला ( पिपरिया) शिवारात दोन ठिकाणी बंदिस्त केलेल्या 49 गोधनाची सालेकसा पोलिसांनी सुटका केली. सालेकसा पोलिसांना टेंभूटोला (पिपरिया) परिसरात दोन ठिकाणी चारापाण्याविना काटेरी कुंपनात गोधन कत्तलखान्याकडे बांधून ठेवल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी टेभूटोला (पिपरीया) जंगल परिसरात धाड टाकून 1 लाख 15 हजार रुपये किमतीचे 23 गोधन दिनेश अशोक कुंभरे (30, रा.चिचटोला) याच्या ताब्यातून जप्त केले. तसेच टेंभूटोला (पिपरीया) ते मुरकुटडोह दंडारी जाणार्‍या रस्त्याचे बाजुला असलेल्या जंगल परिसरात धाड टाकून 1 लाख 30 हजार रुपये किमतीचे 26 गोधन ताब्यात शाहबाज खान (50, रा.टिमकीटोला मप्र) याच्या ताब्यातून जप्त केले.

दोन्ही आरोपींवर कलम 5 (अ) (1), 5(अ) (2), 5 (ब) (6) महाराष्ट्र प्राणी सरंक्षण कायदा, सहकलम 11 (च) (ज) (झ) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतीबंध कायदा 1960 अन्वये गुन्हा दाखल केला असून ताब्यात घेतलेले गोधन कोरणी येथील विठ्ठल रुख्मिनी गोशालेत पाठविण्यात आले. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोनि बाबासाहेब बोरसे, पोउपनि अमोल मुंडे, पोशि इंगळे, वेदक यांनी केली.


 

Leave a Comment

और पढ़ें