शहापूर, ठाणे, 1 : मधील सरलांबे सातगावजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना एक महाकाय क्रेन कामगारांच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा 20 वर पोहोचला आहे. सामना या वृत्तपत्रा च्या ऑनलाईन ने दिलेल्या माहिती नुसार मृतांमध्ये सर्वाधिक कामगार हे उत्तर हिंदुस्थानातील आहेत. तर काही कामगार हे कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगालमधील आहेत.
शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावर असलेल्या सरलांबे गावच्या हद्दीत समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. 31 ऑगस्ट च्या रात्री 11 वाजल्याच्या सुमारास गर्डर आणि गर्डर लाँचर दोन्ही कोसळले. दुर्घटना घडली तेव्हा कामाच्या ठिकाणी 17 कामगार आणि 9 इंजिनियर काम करत होते. गर्डर आणि गर्डर लाँचर कामगारांवर कोसळल्याने 17 जणांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांची नावे
1 )अरविंदकुमार उपाध्याय 33 उत्तर प्रदेश
2)गणेश रॉय 40 पश्चिम बंगाल
3)ललन राजभर 38 उत्तर प्रदेश
4)परमेश्वर सहानी 25 उत्तर प्रदेश
5)नितीनसिंह विनोदसिंह २५ उत्तरप्रदेश
6मनोजसिंह यादव 49 बिहार
7)संतोष इलागोवन 36 तामिळनाडू
8)राधेश्याम यादव 40 उत्तर प्रदेश
9)आनंदकुमार यादव 25 उत्तर प्रदेश
10)पप्पूकुमार साव 20 बिहार
11)कनन वेदर्थीनम 23 कर्नाटक
12)सुब्रोत सरकार 23 पश्चिम बंगाल
13)सुरेंदर पासवान 35 उत्तर प्रदेश
14)बलराम सरकार – पश्चिम बंगाल
15)लवकुश रामुदिन सावुकुमार 28 बिहार
16)प्रदीपकुमार रॉय 44 पश्चिम बंगाल
17)मंगेश शर्मा 34 उत्तराखंड
18)सत्यप्रकाश पांडे 30 बिहार
19)रामाशंकर यादव 46 उत्तरप्रदेश
20)सरोजकुमार जगदीशकुमार 18 उत्तरप्रदेश