गोंदीया जिल्ह्यात दारूबंदी कायद्यान्वय 178 गुन्हे दाखल, लाखोचा मुद्देमाल जप्त.


गोंदिया, दिनांक : 01 ऑगस्ट : जिल्ह्यातील 4 उपविभागा अंतर्गत असलेल्या 16 पोलीस ठाणे अंतर्गत हद्दीत दिनांक 25 ते 31 जुलै 2023 दरम्यान अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. सदरचे विशेष मोहिमे दरम्यान गोंदीया जिल्ह्यातील 4 उपविभाग 16 पोलीस ठाणे अंतर्गत दारूबंदी कायद्यान्वये- कारवाई करून 178 गुन्हे दाखल करण्यात आले. ज्यात एकूण 1410 लिटर मोहाफुलाची दारू, तर 122.350 लिटर देशी दारू आणि 17, 570 किलो सडवा मोहफुल रसायन साहित्य जप्त करण्यात आले.

त्याचप्रमाणे जुगार कायद्यान्वये 14 कारवाई करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात आले. ज्यात एकूण 8 लाख 2167 रुपयाचा जुगार साहित्य मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. विशेष मोहीम दरम्यान एकूण 14 लाख 15, हजार 67 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. तसेच कलम 93 अंतर्गत प्रतिबंधात्मक म्हणून 9 कारवाया करण्यात आल्या संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्या विरूद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, अशोक बनकर यांचे आदेशा प्रमाणे सदरची कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न गोंदिया पोलिस विभाग मार्फत करण्यात येत आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें