सडक अर्जुनी, दिनांक : ०१ ऑगस्ट : तालुक्यातील ग्राम घाटबोरी तेली येथे शेतात काम करताना एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने त्याचे जागीच मृत्यु झाले होते. ही घटना दि. २१ जुलै रोजी घडली होती. मृतक शेतकर्याचे नाव ओमदास वाघाडे असे आहे. मुंबई येथे होत अश्लेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार मनोहर चंद्रिकापुरे वेस्त होते. मुंबई वरून येताच त्यांनी प्रथम मृतक कुटुंबाची ३० जुलै रोजी त्यांच्या घरी घाटबोरी तेली येथे जावून कुटूंबाला सात्वन भेट दिली. भेटी दरम्यान मृतक कुटुंबीयास दिलासा देत आमदार मोहोदयांनी मृतकाच्या मुलास व पत्नीस शासनाकडून मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित एफआरटी शहा, उमराव मांढरे, नाजूक झिंगरे, श्रीराम झिंगरे, दिनेश झिंगरे व गावातील ग्रामस्थ होते.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 72