गोंदिया, दि. 28 जुलै : पुण्यातील दहसतवादी पथकाचे धागे दोरे गोंदियात पोहचले आहेत. मूळचा रामनगर गोंदिया येथे राहणारा अब्दुल कादीर पठाण, वय 35 , हल्ली मुक्काम कोंढवा, पुणे, यास दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, ATS यानी सदर शंसईत वेक्तिला अटक केल्याची माहिती मिळत आहे.
काही दिवसा पूर्वी मूळ गावी गोंदिया ला आलेला पठाण यास गोंदिया पोलिसांनी चौकशी कामी काही दिवसा पूर्वी ताब्यात घेतले होते. पुढील चौकशी कामी त्यास पुण्यात बोलावण्यात आले होते.
अखेर प्राप्त पुराव्या अंती त्यास दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य यानी पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केले असल्याचे समजते. त्याने काही दहशत वादी लोकांना मदत केली होती. अशी देखील माहिती वृतातुन समोर येत आहे.
सदर विषयाची सर्व माहिती तपासी यंत्रणा गोळा करत असल्याची माहिती गोंदिया पोलिसांनी दिली आहे. त्यातच कुठलीही अफवा पसरवू नये असे आव्हाहन पोलिस अधीक्षक गोंदिया यांनी जनतेला केलं आहे. पोलिस नक्कीच आपल काम करीत आहे. त्याची सत्यता तपासातून समोर येईल असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.