सडक अर्जुनी, दिनांक : २३ जुलै : २१ जुलै रोजी तालुक्यातील ग्राम घाटबोरी तेली येथील शेतकरी ओमदास सखाराम वाघाडे वय ५५ यांचा वीज पडून आकस्मिक मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा जि. ओ. सी. मिथुन मेश्राम स. सै. द. यांनी घाटबोरी गाव गाठुन वाघाडे परीवाराची सांत्वन भेट घेतली. मृतकाच्या परिवारात पत्नी, दोन मुले, त्यांच्या पत्नी असा मोठा परिवार आहे.
घरचा कर्ता व्यक्ती गेल्याने वाघाडे परिवारावर एक मोठे संकट आले. या संकटातुन सावरण्यासाठी त्यांना शक्ती मिळो अशी प्रार्थना केली. शासना मार्फत वाघडे परीवाराला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपन प्रयत्न करणार असी ग्वाही मिथुन मेश्राम यांनी दिली.
यावेळी माजी उपसरपंच नाजुकराम झिंगरे, युवा मित्र प्रतिष्ठान चे सदस्य चेतन मोहतुरे, श्रीकांत वैद्य व गावकरी उपस्थित होते.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 34