तब्बल पंधरा तास महामार्ग जाम, तरीही वाहतूक सुरळीत नाही?


  • डांबर मार्गावर डांबर दिसेनासा झाला इतके खड्डे 

सडक अर्जुनी, ( बबलू मारवाडे ) दिनांक : १८ जुलै २०२३ : नागपूर ते रायपुर या महामार्गावर तब्बल पंधरा तास वाहतूक जाम होती. एवढा कालावधी लोटला तरी देखील वाहतूक सुरळीत झाली नाही. हा वाहनांचा जाम गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सावंगी पासून ते देवरी तालुक्यातील डोंगरगाव डेपो पर्यंत लागला होता. सकाळी तीन वाजता पासून सायंकाळी सात वाजता पर्यंत वाहनांचा जाम होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ असे या मार्गाचे नाव आहे. देवरी येथील अग्रवाल नामक कंपनी येथे ब्रिज निर्मितीचे बांधकाम गेली दोन वर्षे पासून करीत आहे.



ज्या ठिकाणी पुलाचे म्हणजे ब्रिज चे बांधकाम चालू आहे. त्याच्या अगदी बाजूने राष्ट्रीय महामार्ग अश्ल्याने, या मार्गावर नियमित अवजड वाहनांची वर्दळ असते. या वर्दळीच्या मार्गाची दुरुस्ठी करण्याचे काम सबंधित बांधकाम कंपनीचे आहे. असे महामार्ग पोलिस सांगतात. असे अशले तरी कंपनी या मार्गाची नियमित दुरुस्ती करीत नश्ल्याने या मार्गावर मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्यांमुळे येथे नियमित अपघात देखील होतात. मार्गावर पडलेल्या खड्यांमध्ये अवजड वाहनांना धक्का बसते अश्यात वाहनाचे साहित्य तुटतात. आणि मुख्या मार्गावर वाहन उभे राहतात. वन विभागाच्या जागेतुन एकेरी वाहतूक मार्ग अश्ल्याने वाहने पास होत नाही. परिणामी महामार्गावर वाहनांचा जाम लागते.

एका वाहन धारकाने सांगितले की आज १८ जुलै रोजी याच मार्गावर एका वाहनाचे साहित्य तुटल्याने सकाळी तीन वाजता पासून वाहनांचा जाम लागला आहे. पुन्हा याच मार्गावर दुशर्या वाहनाचा डीजेल संपल्याने वाहन मुख्य मार्गावर उभा होता. पुन्हा सकाळी १० वाजता तिसर्या वाहनाचे साहित्य तुटले होते. त्या मुळे या मर्गावर आज मोठा जाम लागला होता. हा जाम तब्बल पंधरा ते सोडा तास होता. एवढ्या कालावधी नंतर देखील या मार्गाची वाहतूक सुरळीत झाली नाही. महामार्ग पोलिसांनी मोठी कसरत करून आता मार्ग मोकळा केला आहे. मात्र पुन्हा कधी जाम लागेल ते सांगता येत नाही.


 

Leave a Comment

और पढ़ें