तांदूळ नगरीत आधिकऱ्यांच्या संगनमताने तांदळाचा काळा बाजार?


  • गोंदिया वरून बुलढाणा जिल्यात जाणारा तांदूळ केमिकल टेस्टिंग मध्ये फेल.
  • आमदारांनी पाहणी करीत एकाच दिवशी चार लॉट तांदूळ केले रद्द.
  • नागरीकांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ राशन दुकानातून वाटप.

गोंदिया, दी. 18 जुलै 2023 : गोंदिया जिल्ह्याची तांदूळ नगरी म्हणून ओळख आहे. मात्र याच जिल्ह्यात तांदळाचा काळा बाजर होत असल्याची माहिती आता समोर येत आहे. देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी देवरी तालुक्यातील आशु तांदूळ गोदामात जाऊन तांदळाची पाहणी केली असता. गोदामात ठेवलेला सर्व राईस मिल मालकांचा तांदूळ एक सारखा दिसल्याने आणि जुना तांदूळ जमा केला असल्याने आमदार कोरोटे यांनी आपल्या समोर तांदळाची गुणवंता केमिकल टेस्टिंग द्वारे तपासून घेत.



गोदामात डम्प करण्यात आलेला चार लॉट तांदूळ हा केमिकल टेस्टिंग मध्ये फेल झाल्याने. जिल्हा पुरवठा अधिकर्यांना हा तांदूळ रद्द करून राईस मिल मालकांवर कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार कोरोटे यांनी दिल्या आहेत.

तर मागील वर्षी देखील याच गोदामात देवरी तालुक्यातील ७ राईस मिल मालकांनी जमा केलेला २१ लॉट तांदूळ हा मानवी खाण्यास योग्य नसल्याने केंद्रीय पथकाने आपल्या तपासणीत रद्द केला असून. एका वर्षा नंतर जिल्हाधिकऱ्यानी या ७ राईस मिलला तीन वर्षा करिता ब्ल्याक लिस्ट केले आहे.

तर याचा गोदामातील त्या वेळचे तत्कालीन तांदूळ गुणवत्ता अधिकारी आणि सध्या अतिरिक्त जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून नेमणूक असलेले सतीश अगडे यांनी हा तांदूळ केमिकल टेस्टिंग मध्ये फेल असताना घेतला कसा जो आजही गोदामात पडून आहे.

अस्या अधिकाऱ्यांना पदोन्नती का दिली ज्या अधिकार्यामुळे आज कोट्यवधी रुपयांचा तांदूळ गोदामात पडून खराब होत आहे. असा प्रशन आमदार मोहद्यानी जिल्हा पुरवठा आधिकारी प्रकाश पाटील याना फोन वर केला असता जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी आमदारांना समाधान कारक उत्तर न दिल्याने.

आमदार मोहद्यानी बुलढाणा जिल्यात तांदूळ भरून घेऊन जाणाऱ्या एका ट्रक मधील तांदळाची केमिकल टेस्टिंग केली असता तोही तांदूळ केमिकल टेस्टिंग मध्ये फेल झाल्याने. बुलढाणा जिल्यात तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रक ला पुन्हा तांदूळ गोदामात तांदूळ खाली करून मिल मालकावर कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार मोहद्यानी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील याना दिल्या आहेत.

तर दुसरीकडे जिल्हा मार्केटींग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने गोंदिया जिल्यात ५० लक्ष किवींटलच्या वर धान्य शेतकर्यां कडून शाशकीय दराने विकत घेत. गोंदिया भंडारा जिल्या सह गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्यातील राईस मिल मालकांकडून धान्याची भरडाई करून तांदूळ शाशकीय गोदामात जमा करणायचा करार केला आहे. मात्र राईस मिल मालकांना दिलेल्या धान्याची काही राईस मिल मालक भरडाई न करता. राईस मिल मालक गोंदिया जिल्यातील धान्याला छत्तीसगढ राज्यात जास्त दर मिळत असल्याने विक्री करून. उत्तर प्रदेश राज्यातील हलक्या दर्जाचा तांदूळ विकत घेत गोंदिया जिल्यातील शाशकीय तांदूळ गोदामात अधिकऱ्यांच्या संगनमताने जमा करत आहेत.

शासकीय गोदामात जमा केलेला तांदूळ हा राज्यातील इतर जिल्यात शासकीय स्वतः धान्य दुकानाच्या माध्यमातून नागरिकांना पुरविण्यात येत असल्याने. शासनाने या तांदळात FRK RICE म्हणजे (FORTIFIED RICE KERNELS ) हा तांदूळ साध्या तांदूळात मिक्स करण्यासाठी राईस मिल मालकांना देण्यासाठी तांदूळ गोदामात उपलब्ध करून दिला आहे. मात्र राईस मिल मालक FRK RICE जमा करण्यात येणाऱ्या तांदुळात मिक्स करीत नसल्याचा आमदार कोरोटे यांच्या तपासणीत उघड आला आहे.

त्यामुळे तांदूळ नगरीत आधिकऱ्यांच्या संगनमताने तांदळाचा काळा बाजारी होत असल्याने पावसाळी अधिवेशनात हा मुदा सरकारच्या निदर्शनांस आननार असल्याचे आमदाराणी सांगितले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी या संदर्भात राईस मिल मालकांवर काय कार्यवाही करनार हे पाहण्या सारखे असेल.


 

Leave a Comment

और पढ़ें