लोहिया विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा


सौंदड, दिनांक : ०५ जुलै :  लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने ३ जुलै २०२३ ला गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक जगदीश लोहिया, जि. प. सदस्य निशा तोडासे, लोहिया शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष घाटबांधे, संस्था सदस्य पंकज लोहिया, माजी सरपंच गायत्री इरले, तंटामुक्त समिती अध्यक्ष चरणदास शहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत, सरपंच ग्रा. पंचायत फुटाळा लता गहाने, अनिल मेश्राम, अनिल दिक्षित, हरणे सर, पांडुरंग जांभूळकर, वसंता विठ्ठले, गुलाब शहारे, पुरूषोत्तम लांजेवार, प्रल्हाद कोरे, मोहन भेंडारकर, भजनदास बडोले, डॉ. मारगाये, दिलीप शहारे, नलिराम चांदेवार,राजकुमार चांदेवार, देवराव मासुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख अतिथिंनी भगवान ओम्, भगवान श्री गणेश व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी प्रामुख्याने प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षिका कल्पना काळे, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व उपस्थितांनी समृध्दी महामार्गावर घडलेल्या अपघातात मृत झालेल्या लोकांना दोन मिनिटांचे मौन ठेऊन श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश लोहिया, यांनी ‘गुरू हा जीवनरुपी भवसागरातून आपली नौका किनाऱ्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करतो, विद्यार्थ्यानी गुरूच्या मार्गदर्शनात आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने प्रयत्न करा, व भारताला विश्र्वगुरू बनविण्याच्या मार्गातील वाटेकरी व्हा” असे मार्गदर्शन केले.

प्राचार्य मधुसूदन अग्रवाल यांनी गुरुपौर्णिमे विषयी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. जि. प. सदस्य निशा तोडासे, सौंदडच्या माजी सरपंच गायत्री इरले यांनी देखील गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील स. शि. व्ही. एफ. घनमारे, कू. यू. आर. बाच्छल तसेच विद्यार्थांनी आपल्या गीतातून आणि मनोगतातून गुरुपौर्णिमेचे महत्व विषद केले. कार्यक्रमाला लोहिया शिक्षण संस्थेच्या विविध कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यगन, निमंत्रित पाहुणे, पालकवर्ग, विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स. शि. कू. यू. बी. डोये यांनी केले तर आभार. स. शि. टी . बी. सातकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.


 

Leave a Comment

और पढ़ें