आमगाव, दिनांक : १० जून २०२३ : तालुक्यातील ग्राम कालिमाटी येथे आज १० जून रोजी आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार सहसराम कोरोटे आमगाव/ देवरी विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नागपुर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर उपस्थित होते. यावेळी शस्त्रक्रिया शिबिर, आरोग्य शिबीर, मोतीबिंदू शत्रक्रिया, मोफत चस्मे वाटप चे आयौजन करण्यात आले होते. प्रसंगी उपस्थित मान्यवर संजय बहेकार अध्यक्ष ता. कॉ. कमिटी आमगाव, उषाताई मेंढे जिल्हा परिषद सदस्या गोंदिया, छबूताई उके जि. प. सदस्या, भोजराज जैतवार उपाध्यक्ष आमगाव तालुका कांग्रेस कमेटी, शीलाताई चुटे सरपंच कलिमाती, दिपक ( राजा ) कोरोटे अध्यक्ष आमगाव-देवरी विधानसभा युवक कांग्रेस, बळीराम कोटवार, बबलु कुरेशी नगरसेवक देवरी, जैपाल प्रधान, सचिन मेळे सह गावकरी व कार्यकर्ते मोठ्या संखेत उपस्थित होते.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 47