सौन्दड च्या लोहिया विध्यालयात विज्ञान शाखेचा व आय.टी. चा निकाल 100 टक्के


सौंदड, दिनांक : २८ मे २०२३ : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनदास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय सौंदड येथील एच.एस.सी. फेब्रुवारी/मार्च 2023 परीक्षेत विज्ञान शाखेचे एकूण 82 विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यांपैकी 82 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. असून यात 02 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर 48 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

कला शाखेचा निकाल 85.52 टक्के आहे. कला शाखेचे एकूण 76 विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यांपैकी 65 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. असून यात 08 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर विज्ञान शाखेचे प्रविष्ट ८२ पैकी ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. असून आय.टी. विषयाचा निकाल सुद्धा १०० टक्के आहे.

विज्ञान शाखेतून कु. कालिका दीघोरे हिने 78.83 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक, अर्णव इरले ह्याने 75.68 टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर पूजा निनावे हिने 72.33 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. कला शाखेत कू. कामिनी टेभूर्णे हिने 71.17 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक, कू. प्रतिमा बनकर हिने 66.50 टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर कू. राणी मोहुर्ले हिने 63.83 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

सर्व प्राविण्य प्राप्त व उत्तीर्ण विद्यार्थांचे संस्थापक – संस्थाध्यक्ष – जगदीश लोहिया – लोहिया शिक्षण संस्था, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल व गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे,पर्यवेक्षिका कल्पना काळे, प्राध्यापक राजेश अग्रवाल तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व भावी यशाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील व गुरूजनांना दिले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें