लैंगिक शोषण प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी; न्यायालयाने ठोठावला 41 कोटींचा दंड!


नवी दिल्ली, वृतसेवा : दिनांक : १० मे २०२३ : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. न्यूयॉर्क येथील न्यायालयाने ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरवले असून लेखिका ई जीन कॅरोल यांना 5 लाख डॉलरची ( जवळपास 41 कोटी ) ची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या 9 सदस्यीय समितीने ट्रम्प यांना लैंगिक शोषण आणि लेखिका कॅरोल यांची बदनामी केल्याबद्दल दोषी ठरवले. मात्र बलात्काराचा आरोप फेटाळून लावल्याने ट्रम्प यांना थोडासा दिलासा मिळाला.


https://help.twitter.com/en/twitter-for-websites-ads-info-and-privacy


एका मासिकाच्या लेखिका असणाऱ्या ई जीन कॅरोल यांनी 2019 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर बलात्काराचा आरोप केला होता. 1996 मध्ये ट्रम्प यांनी आपल्यावर मॅनहॅटन डिपार्टमेंटल स्टोअरच्या ड्रेसिंग रुममध्ये बलात्कार केल्याचा दावा कॅरोल यांनी केला होता. कॅरोल यांनी आपल्या पुस्तकामध्ये या घटनेचा सर्वात आधी उल्लेख केला होता.

90 च्या दशकामध्ये ट्रम्प यांनी लैंगिक शोषण केले, आपल्यावर बलात्कार केला असा आरोप कॅरोल यांनी केला. मात्र ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावत आपण कॅरोलला ओळखतही नसून तिला स्टोअरमध्ये कधी भेटलोही नसल्याचे म्हटले होते. तसेच ती पुस्तक विकण्यासाठी हा दावा करत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला होता.

दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी 25 एप्रिलपासून सुरू झाली होती. खटल्यादरम्यान अन्य दोन महिलांनीही ट्रम्प यांच्या विरोधात साक्ष दिली. ट्रम्प यांनी 2005 मध्ये माझे जबरदस्तीने चुंबन घेतले, असे पीपल मॅगझिनच्या रिपोर्टर नताशा स्टॉयनोफने सांगितले. तर अशीच घटना आपल्यासोबत 1979 मध्ये घडल्याचे जेसिका लीड्स नावाच्या महिलेने सांगितले. याचीही न्यायालयाने दखल घेतली.

न्यायालयाने 1990 च्या दशकामध्ये एका मासिकाच्या लेखिका ई जीन कॅरोल यांच्या लैंगिक शोषण प्रकरणी ट्रम्प यांना दोषी ठरवले. ट्रम्प यांनी अनेकदा खोटं बोलून कॅरोल यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत कॅरोलला 41 कोटींची भरपाई देण्याचे आदेश दिले. न्यायालयाने ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणी दोषी ठरवले असले तरी त्यांच्यावरील बलात्काराचा आरोप मात्र फेटाळला आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें