गोंदिया कोहमारा मार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी


गोंदिया, दिनांक : १० मे २०२३ : गोंदिया वरून नागपूरकडे जाणाऱ्या कारचा गोंदिया – कोहमारा मार्गावर अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की २४ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला. याच कारमध्ये असलेले आणखी ४  जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. महंमद शेख असे मृत चालकाचे नाव आहे. अपघातग्रस्त कार गोंदियाहून नागपूरकडे निघाली होती.

दरम्यान, कोहमारा मार्गावरील ग्राम भुसारीटोलाजवळ कार अनियंत्रित झाल्याने झाडावर आदळली, यात चालक जागीच ठार झाला, तर कारमधील अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ०९ मे रोजी सकाळी घडली. जखमी मध्ये अखिल पांचालु (२९ ), समीर नसीर शेख (२६), अंजुम अफरोज शेख (३२), रानू कुरैशी (२८) यांचा समावेश आहे. जखमी झालेल्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतकाचे सव विच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें