श्रमाच्या कष्टातुन आपले अमूल्य जिवन फुलवावे : आ. मनोहर चंद्रिकापुरे


सडक अर्जुनी, दिनांक : ०६ मे २०२३ :  भीमशक्ती मंडळ तथा रमाबाई भीमज्योती महिला मंडळ राजोली/भरनोली च्या सौजन्याने प्रदण्या बौद्ध विहार राजोली पुतळ्यांचा भव्य अनावर सोहळा व प्रबोधन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन प्रवास हा अत्यंत संघर्षमय होता.

शोषित पीडित, दिन दलित समाज हेच माझे कुटुंब परिवार आहे. असे समजून त्यांच्या उद्धारासाठी आपले जिवन समर्पित केले. देशातील सर्व समाजाला संविधानाच्या चौकटीत आणून समान अधिकार, आरक्षण देऊन देश एकसंघ ठेवला. प्रत्येकांनी महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात करुन समाजात बंधुत्व व समताधिष्ठीत समाजाची भावना निर्माण करावी. भारतरत्न परमपुज्य डॉ बाबा साहेबांच्या विचाराची जाणीव करुन घेणे हि काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले.

समाजातील प्रत्येक व्यक्तीने महामानव यांचे विचार आणि आचार अंगीकार करता येत नसतील तर समाजाची प्रसंगी व्यक्तीची प्रगती ही शून्य होते. परिस्थितीवर मात करून आपल्या समाजातील मुल ही प्रचंड ताकदीने शिक्षण घेऊन नोकरी करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मदत करीत आहेत. स्वाभिमानाने जिवन जगण्यासाठी आयुष्यात मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे स्वाभिमान शून्य ठेऊन जगण्यापेक्षा श्रमाच्या कष्टातुन आपले अमूल्य जिवन फुलवावे असे मत कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक अर्जुनी/मोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश नंदागवळी माजी समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया, ध्वजारोहक म्हणून जिल्हा परिषद गोंदियाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती इंजि यशवंत गणवीर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, सरपंच जयश्री मस्के, उपसरपंच सदानंद टेकाम, नगरपंचायत गटनेता दाणेश साखरे नगरसेवक, मुन्नाभाई नंदागवळी साहित्यिक, अशोक इंदुलकर माजी जिल्हा परिषद सदस्य, डॉ. चंद्रशेखर बांबोंडे, राजू मेश्राम, संजय रामटेके, रेखा पालीवाल, चरणदास कराडे, योगेश टेंभुर्णे , नेताजी सुकारे, शॉपिंग खा पठाण, गोपाल मस्के, रामलाल कुंभारे, देवा कोरेती प्रामुख्याने उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें