तहसीलदार गणेश खताडे व पोलीस निरीक्षक रेवचंद शिंगंजुडे यांना तत्काळ बडतर्फ करा.


  • माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, गोंदिया जिल्हा अध्यक्ष बबलू मारवाडे यांची लेखी तक्रार 

सडक अर्जुनी, दिनांक : २१ एप्रिल २०२३ : तहसीलदार गणेश खताडे व पोलीस निरीक्षक रेवचंद शिंगंजुडे यांना तत्काळ पदावरून बडतर्फ करा असी लेखी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, कार्यकारनीचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष श्री. बबलू मारवाडे यांनी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे व पोलिस अधीक्षक निखील पिंगळे गोंदिया यांच्याकडे ११ मार्च २०२३ रोजी २१ पानाची लेखी तक्रार पुराव्या निशी केली आहे. तसेच केलेल्या कार्यवाईचा अहवाल अर्जदाराला १० दिवसाच्या आत पुरवावे असे तक्रारीत नमूद केले आहे. आज २१ एप्रिल असून कुठलिही कार्यवाई संबंधित विभागाने केल्याचे दिसून येत नाही.

उपरोक्त विषयांन्वये आज रोजी लेखी तक्रार सादर करीत आहोत की, आपले कार्यक्षेत्र अंतर्गत येत असलेले तहसीलदार गणेश खताडे व पोलिश निरीक्षक रेवचंद शिंगंजुडे यांना दिनांक : ३१/०३/२०२३ रोजी लेखी स्वरूपाचे निवेदन आम्ही दिले आहेत. सदर निवेदनात सडक अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदी पात्रातून विना परवाना वाळूचे उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात आहे.

यात तब्बल ५ ते ७ कोटी रुपयाची वाळू चुलबंद नदीच्या सौन्दड/ फुटाळा, पळसगाव, सावंगी, सावंगी 2, पिपरी या ५ बंद घाटातून उत्खनन करून चोरी करण्याचा सपाटा १५ जानेवारी २०२३ पासून सुरु आहे. नदी काठावर वाळूचे डम्पिंग करून रोज वाळूची वाहतूक केली जात आहे. ही वाळू खुल्या बाजारात ज्यास्त भावाने विक्री केली जाते, व त्यामुळे शासनाला कोट्यावधी रुपयाचा चुना लागला आहे. प्राप्त माहिती नुसार नदी पात्रातून वाळूचे उत्खनन करण्याची परवानगी सध्या नाही.

या बाबद अनेक बातम्या सुधा प्रकाशित झाल्या आहेत. मात्र या प्रकरणाची कुठलीही अध्यापतरी दखल घेतली गेली नाही. यावरून असे लक्ष्यात येते की खुद्द अधिकाऱ्यांचे हात या प्रकरणात आहेत. तरी सुद्धा आपला सन्मान करून निवेदन देत आहोत. ज्या ५ बंद घाटातून वाळूचे अवैध उत्खनन करण्यात आले आहे. त्या खड्यांचे त्वरित मोज माप करून पंचनामे करावे, नदी काठावर असलेल्या वाळूच्या ढिगाचेही तात्काळ पंचनामे करावे. आणि स्थानिक तलाठी व पोलिस पाटील यांच्याकडून वाळू चोरी करणाऱ्या आरोपींचे नावे काढून त्या आरोपींवर दंड आकारून त्यांच्या संपत्तीवर बोजा चढवावे.

असे लेखी स्वरूपाचे निवेदन दिले आहे, परंतु आज रोजी तब्बल १० ते १२ दिवस लोटले असले तरी कुठल्याही प्रकारची दखल तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी घेतली नाही. त्यामुळे या दोघांच्या संगनमताने ही वाळूची चोरी झाली आहे. असे आम्ही गृहीत धरून आपल्याकडे तक्रार सादर करीत आहोत. नदीपात्रातुन झालेल्या वाळू चोरीचे खड्डे आज रोजी जिवंत आहेत. नदीला पाणी आल्यास हे सर्व खड्डे बुजून जातील आणि सर्व पुरावे नष्ठ होतील. त्या अगोदर त्यांचे तत्काळ पंचनामे आपल्या स्तरावर करावे. आणि तहसीलदार गणेश खताडे व पोलीस निरीक्षक रेवचंद शिंगंजुडे यांच्यावर भ्रष्टाचार केल्या प्रकरणी त्यांना पदावरून तत्काळ बडतर्फ करावे.

झालेली शासनाची नुकसान त्यांच्या कडून वसूल करावी, त्यांना वारंवार माहिती देऊन सुद्धा त्यांनी या कालावधीत कुठलीही कार्यवाई केली नाही. त्या मुळे झालेल्या चोरीतून यांना देखील लाखो रुपये मिळाले असावेत. आपण आम्हाला न्याय देणार अशी अपेक्षा आहे. पत्र मिळाल्या पासून १० दिवसाच्या आत केलेल्या कार्यवाईचे अहवाल आमच्या कार्यालयाच्या पत्यावर पाठवावे ही विनंती. आपण कार्यवाही करण्यास हयगय केल्यास मा. उच्च न्यायालय चे नागपूर खंडपीठ येथे आम्ही आपल्या विरोधात दाद मागू , तक्रारी नंतर वरील कुठल्याही तक्रारदाराच्या जिवाची काही हानी झाल्यास आपण व आपले प्रशासन याला सर्वस्वी जबाबदार राहील याची सुद्धा आपण नोंद घ्यावी. असे लेखी तक्रारीत नमूद आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें