वाळू चोरांनी पोखरले नदी पात्र; तालुका प्रशासनाची मात्र मुखसंमती?


सडक अर्जुनी, दी. 15 एप्रिल 2023 : सातत्याने वाळू चोरी विरोधात बातम्या प्रकाशित केल्या जात आहेत. तरी देखील तालुका प्रशासन शांत बसले आहे. त्या मुळे प्रशासनाची या वाळू चोरांना मुखसंमती तर नाही ना असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. तब्बल दोन महिने वाळू चोरांनी चुलबंद नदी पात्र पोखरले आहे. यात तब्बल 7 ते 8 कोटी रुपयाची वाळू चोरीला गेली आहे.

आता नव्या ठिकाणी जागा शोधून पुन्हा नदी पात्र पोखरन्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. तालुक्यातील वाळू ( रेती ) अवैध रित्या उत्खनन करून दुशर्या तालुक्यात विक्रीसाठी महामार्गांने ट्रॅक च्या साह्याने पाठविली जाते. अश्यात महामार्गावर देखील पोलिस अधिकारी कार्यरत असतात. मात्र त्यांचे कडून देखील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांवर कारवाई केली जात नाही. त्या मुळे तालुक्यातील अधिकाऱ्यांची वाळू माफियांना मुखसंमती असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

सडक अर्जुनी तालुका हा साधन संपत्तीने पूर्वीपासून नटलेला आहे. त्या संपत्तीची सध्या लुट चालू आहे. मात्र याचे रक्षण करणारे प्रशासकीय यंत्रणा मात्र मुंग गिळून गप्प बसली आहे. सातत्याने होत अश्लेल्या वाळूच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्यास होत आहे. या अवैध उत्खननामुळे नदी पात्र खोल होत आहेत. त्या मुळे पाण्याची पातळीत खोलात गेली आहे. या मुळे शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. अवैध उत्खनन थांबविण्याची मागणी होत आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें