खा. प्रफुल पटेल यांची डॉ. अविनाश जायस्वाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट


तिरोडा, दिनांक : १४ एप्रिल २०२३ : येथे खासदार प्रफुल पटेल यांनी डॉ अविनाश जायस्वाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांशी विविध विषयावर चर्चा करुन समस्या जाणून घेतल्या. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वारे चालू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने निवडणुकीच्या कामाला लागावे.

कृषी उत्पन्न बाजार समिती हि संस्था शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाचे हमीभावाने खरेदी विक्री करण्यासाठी हक्काची संस्था आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाशी निगडित सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी या संस्थेवर किसान सहकार परिवर्तन पॅनल तिरोडा या पॅनलचा झेंडा रोवणे आवश्यक आहे. त्या अनुसंगाने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून जास्तीत जास्त संचालक निवडून आणावे अशी सूचना खासदार प्रफुल पटेल यांनी केली.

यावेळी खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, डॉ अविनाश जैस्वाल, डॉ योगेंद्र भगत, राजलक्ष्मी तुरकर, प्रेमकुमार रहांगडाले, रविकांत बोपचे, अजयसिंग गौर, नरेश कुंभारे, दिलीप असाटी, जिब्राइल पठाण, विजय बंसोड, जगदीश बावनथडे, किरण पारधी, मनोज डोंगरे, वाय. टी. कटरे, राजेश तुरकर, पवन मोरे, ओम पटले, रमेश टेम्भरे, भूमेश्वर पारधी, सलीम जवेरी, डॉ संदीप मेश्राम, जगदीश कटरे, आनंद बैस, राजेश गुनेरिया, प्रभू असाटी, रामकुमार असाटी, विजय बुराडे, प्रशान्त डाहटे, भोजराज धामेचा, सलाम भाई, बंटी असाटी, सुशील असाटी, संजय असाटी, संतोष असाटी, जयाताई धावडे, बबलू ठाकूर, राहुल गहरवार, ओमप्रकाश पटले, अनिल भगत, रमेश टेम्भरे, योगेंद्र कटरे, रामसागर धावडे, परमानंद भगत, विरचंद नागपुरे, प्रलाद मारबदे, दिलीप कावडे, प्रिया पटले, मनीषा पटले, मदनलाल पटले, हितेंद्र बावणे, साशीस बन्सोड, नितेश खोब्रागडे, श्याम शरणागत, प्रफुल धावडे, मुकेश बरईकर, धीरज बराईकर, संजय खियानी, लेहांत ढबाले, विशेष छूगानी, संजय असाटी, भरत मल्लेवार, राजू भोयर सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें