वैयक्तिक समस्यांना नेहमीच प्राधान्य देण्याची माझी भूमिका – आमदार विनोद अग्रवाल


  • आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते परसवाड्यात ३.८६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

प्रतिनिधी/गोंदिया, दिनांक : ११ एप्रिल : गोंदिया विधानसभा मतदार संघात आ. विनोद अग्रवाल यांच्या अविरत कार्यामुळे गोंदिया विधानसभा मतदार संघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरु झाली असून खर्‍या अर्थाने गोंदिया विधानसभा मतदार संघात अनेक विकासकामे दिसून येत आहेत. आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यशैलीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न, आरोग्याच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने नुकतेच जल जीवन अभियानांतर्गत 228 कोटींच्या मंजूर झालेल्या हर घर जल, हर घर नल योजनेचे काम संपूर्ण विधानसभा परिसरात सुरू झाले असून, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिवसाचे 24 तास पाणी मिळेल.त्याचा पाणीपुरवठा धापेवाडा येथील कवलेवाडा धरणातून केला जाणार आहे.

आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून विधानसभा मतदारसंघातील परसवाडा गावात 3 कोटी 86 लाखांचा निधी मंजूर झाला. त्याअंतर्गत समाज मंदिर बांधकाम दुर्गा चौक परसवाडा 10 लाख, शिवमंदिर जावळ चावडी बांधकाम 3 लाख, राजाभोज स्मारक स्टेज बांधकाम 2 लाख, तलाठी कार्यालय बांधकाम 29 लाख, परसवाड़ा – बिरसी डांबरी रस्ता 2 कोटी, परसवारा – मोगरा डांबरी रस्ता 10 लाख. बटालियन मोगरा रस्ता बांधकामात 100 लाखांच्या कामांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, गावाचा सर्वांगीण विकास व वैयक्तिक समस्यांना प्राधान्य देण्याची माझी नेहमीच भूमिका राहिली असून जनतेचे प्रेम व आपुलकीमुळेच मला विकासकामे करण्याची ताकद मिळते. तसेच आम्ही कधीही कोणाशी भेदभाव न करता काम केला काम केले आहे, जनतेला नेहमीच देव मानून काम केले आहे.जनतेच्या समस्यांना विशेष प्राधान्य देऊन परिसरात कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून विकासकामे केली आहेत. प्रत्येक गावात महिला बचत गटाची बांधणी, शेतकऱ्यांसाठी कृषी गोदाम, युवकांसाठी उपयुक्त पुस्तके, क्रीडा महोत्सवाचे आयोजन, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, निराधार पेन्शन योजना, हर घर नल हर घर जल योजना, गृहनिर्माण योजना, पांदण रस्ता, शेतकऱ्यांचा अगणित विकास 7/12 ऑनलाइन, ग्रामीण रस्त्यांना शहरांशी जोडणारी कामे गेल्या 3 वर्षांत झाली आहेत. अशी माहिती आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली.

या दरम्यान आ.विनोद अग्रवाल सभापती मुनेश रहांगडाले, छत्रपाल तुरकर, अध्‍यक्ष जनता की पार्टी, चैताली पृथ्‍वीराज नागपूरे, अध्‍यक्ष महिला आघाडी, चेतनजी बहेकार, महामंत्री जनता की पार्टी, लखनजी हरिनखेड़े, जि.प. प्रमुख पांजरा क्षेत्र, वैशाली पंधरे, जि.प सदस्‍य, सोनुला बरेले, पं.स. सदस्‍य, रेखाबाई जगदिश पारधी, सरपंच परसवाडा, संतोष हनवते, उपसरपंच परसवाडा,डेलेन्‍द्र हरिणखेडे, ग्रा.प. सदस्‍य, किशोर उईके, ग्रा.पं. सदस्‍य, राहुल भावे, ग्रा.प. सदस्‍य, पंचफुला मडावी, ग्रा.प. सदस्‍या, उर्मिला शरणागत, ग्रा.प. सदस्‍या, छाया गौरीशंकर हनवते, ग्रा.प. सदस्‍या,चिहारी पारधी, हरिभाऊ हरिणखेडे, मिताराम पारधी, मुन्‍नालाल नागपुरे, मंसाराम पारधी, बाबुलाल अंबुले, लखन हनवते, शालीकराम शरणागत, मुलचंद हरिणखेडे, हनेन्‍द्र पारधी, रोशन रणगीरे, प्रेमलाल सोनवाने, जियालाल मेश्राम, काशीराम पंधरवार, मनोहर भावे, संतोष वैध, अंनदी हनवते, राधेलाल चौधरी, प्रदिप पटले, गोरेलाल पटले, रामजी रहांगडाले, राजकुमार तुरकर, राजाराम बावने, छबिलाल बावने, गंगाराम पंधरवार, किर्तीकुमार बोपचे, आडेगण बिसेन, जितेन्‍द्र चिखलौडे, धनिराम मानकर, युवराज टेंभरे.मुन्‍नालाल पारधी, तंटामुक्‍ती अध्‍यक्ष, इंदिरा कुलेन्‍द्र पारधी, पोलीस पाटील इत्यादी इस अवसर पर उपस्थित थे.


 

Leave a Comment

और पढ़ें