पोलीस अधीक्षक कार्यालयात महात्मा ज्योतीबा फुले यांना जयंती निमित्ताने अभिवादन!


गोंदिया, दिनांक : ११ एप्रिल २०२३ : सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायान्वये सन २०२३ मध्ये राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ति यांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती साजरी करण्यात यावी असे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या हस्ते आज दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय, गोंदिया येथे महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

जयंती कार्यक्रमात पोलीस अधिक्षक गोंदिया, यांच्यासह पोलीस उप-अधिक्षक ( मुख्या. ) दिनकर ठोसरे, पोनि नंदिनी चानपुरकर, सपोनि संजय नाईक, महादेव शिद, पोउपनि श्रीकांत हत्तीमारे तसेच पोलीस अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ मोठया संख्येने उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें