लोहिया विद्यालयात माहात्मा फुले जयंती साजरी


सौंदड, दिनांक : ११ एप्रिल २०२३ : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सौंदड येथे 11 एप्रिल 2023 रोज मंगळवारला जगदीश लोहिया संस्थापक/ संस्थाध्यक्ष लोहिया शिक्षण संस्था यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक मधुसूदन अग्रवाल यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यालयात माहात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कल्पना काळे यांनी प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक आर. एन. अग्रवाल, यु. आर. बाच्छल, व्ही.एफ. घनमारे, प्राध्यापक कावळे उपस्थित होते. विद्यालयातील पर्यवेक्षिका कल्पना काळे यांनी माहात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेक्तर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स. शिक्षिका यु. बी. डोये यांनी केले.


 

Leave a Comment

और पढ़ें