अवैध वाळू उत्खणनाची तक्रार न करण्यासाठी पोलीस पाटलाने मागितली 2 लाख रुपयाची लाच


उस्मानाबाद, वृतसेवा, दिनांक : २६ मार्च : वाळू उत्खननाचा ठेका मिळालेल्या एका तरुण ठेकेदाराला कारवाई करण्याची धमकी देत ढगपिंपरी येथील पोलील पाटलाने 2 लाख रुपये लाचेची मागणी केली. या पैकी 70 हजार रुपये लाच घेताना उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस पाटलास रंगेहाथ पकडले. उस्मानाबाद एसीबीच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी ( दि. 24 मार्च ) रोजी केली. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत एका 26 वर्षाच्या ठेकेदाराने उस्मानाबाद एसीबीकडे 9 मार्च 2023 रोजी तक्रार केली होती. शुक्रवारी पडताळणी करुन पोलीस पाटील हरिदास लिंबाजी हावळे ( वय 51, रा. ढगपिंपरी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद ) याला लाच घेताना अटक केली.

तक्रारदार यांना परंडा तालुक्यातील ढग पिंपरी गावच्या हद्दीतील चांदणी नदी पात्रातील वाळू उत्खनन करण्याचा लिलाव मिळाला होता. या वाळू घाटावर नियमबाह्य उत्खनन होऊ नये, याच्या पाहणीसाठी ग्राम दक्षता समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये पोलीस पाटील हरिदास लिंबाजी हावळे हे सदस्य आहेत. हावळे यांनी तक्रारदार यांना तुम्ही नियमबाह्य वाळू उत्खनन करताय, त्याचे फोटो काढून महसूल विभागाला पाठवतो आणि तक्रार करतो असे सांगून फोटो काढून महसूल विभागाला तक्रार न करण्यासाठी दोन लाख रुपये लाच रक्कम मागितली. तडजोडी अंती 9 मार्च रोजी 70 हजार रुपये घेण्याचे मान्य केले. दरम्यान, वाळू ठेकेदाराने पोलीस पाटलाची उस्मानाबाद एसीबीकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी करुन शुक्रवारी ढगपिंपरी येथे सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 70 हजार रुपये लाच घेताना पोलीस पाटील हरिदास हावळे याला रंगेहाथ पकडले.


 

Leave a Comment

और पढ़ें