प्रा. मंजुताई चंद्रिकापुरे यांच्या उपस्थित पांढरी येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.


सडक अर्जुनी, दिनांक : ०४ फेब्रुवारी : २०२३ : तालुक्यातील पांढरी येथे प्रा. मंजुताई चंद्रिकापुरे यांनी सार्वजनिक हळदी कुंकू‎ कार्यक्रमातून विविध सामाजिक‎ संदेश देत एका अनोख्या पध्दतीने‎ संक्रांत साजरी केली.‎ मकरसंक्रांती म्हंटले की,‎ महिलांचा जिव्हाळ्याचा विषय‎ येतो. मंजूताई यांनी वाण म्हणून महिलांना भेटवस्तू दिल्या. विशेष‎ म्हणजे केवळ हळदी कुंकू कार्यक्रम‎ न ठेवता सदर कार्यक्रमा अंतर्गत‎ विविध सामाजिक संदेशाची‎ वाणाच्या रूपात देवाणघेवाण केली. ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎विविध सामाजिक संदेश देऊन प्रा. मंजूताईनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून‎ घेतले. या कार्यक्रमासाठी सुधा रहांगडाले जि.प. सदस्य, शामकला करचाल सरपंच गोंगले, उज्वला हटवार सरपंच दुंडा, रेखा कोसरकर, अनिता बांबोर्ड, मेश्राम ताई, भानुमती बोपचे, खीलवंता येडे, योगेश्वरी पटले, गुणवंता कापगते, संघमित्रा डोंगरे सरपंच खाडीपार, व परिसरातील मोठ्या प्रमाणात महिलांनी पुढाकार घेत‎ कार्यक्रम यशस्वी केला.


 

Leave a Comment